शहरं
Join us  
Trending Stories
1
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
2
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
3
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
4
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
5
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
6
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
7
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
8
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
9
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
10
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
11
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
12
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
13
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
14
"प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर भाजपा…’’ नाना पटोले यांची टीका   
15
हा घ्या पुरावा! पाकिस्तान पुसतोय 'ऑपरेशन सिंदूर'च्या खुणा; एअर बेसवरील बिल्डिंग लाल ताडपत्रीने झाकली
16
SMAT Final 2025 : पुण्याच्या मैदानात ईशान किशनचा शानदार शो! BCCI निवडकर्त्यांसोर षटकार चौकारांचा पाऊस
17
भारताकडे BRICS चे अध्यक्षपद; जागतिक भू-राजकीय तणावात महत्वाची भूमिका बजावणार
18
३१ डिसेंबरसाठी गोव्यात जाताय? कोकण रेल्वेवर विशेष सेवा; पाहा, वेळा, थांबे अन् वेळापत्रक
19
जबरदस्त फिचर्ससह OnePlus 15R भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स!
20
रुपया ९१ च्या पार! स्वयंपाकघर ते परदेशी शिक्षणासह 'या' गोष्टी महाग होणार; 'हे' कधी थांबणार?
Daily Top 2Weekly Top 5

"प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर भाजपा…’’ नाना पटोले यांची टीका   

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 18:10 IST

Nana Patole Criticize BJP: भाजपला सत्तेचा प्रचंड माज आला आहे. या पक्षाला लोकशाही मान्य नाही. अशा पक्षात जाण्यासाठी कोणते प्रलोभन मिळाले, हे तर वेळच सांगेल, परंतु ही संपूर्ण घटना अत्यंत दुर्दैवी असल्याची भावना काँग्रेस माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केली.

मुंबई -  प्रज्ञा सातव यांनी नेमक्या कोणत्या कारणामुळे राजीनामा दिला आणि भारतीय जनता पक्षाने त्यांना नेमके कोणते प्रलोभन दिले हे माहित नाही, मात्र भाजप कडून सातत्याने दुसऱ्या पक्षातील लोकांना फोडण्यासाठी पैशांचे व पदांचे प्रलोभन दिले जाते, हे लपून राहिलेले नाही. भाजपला सत्तेचा प्रचंड माज आला आहे. या पक्षाला लोकशाही मान्य नाही. अशा पक्षात जाण्यासाठी कोणते प्रलोभन मिळाले, हे तर वेळच सांगेल, परंतु ही संपूर्ण घटना अत्यंत दुर्दैवी असल्याची भावना काँग्रेस माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केली.

प्रसार माध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, सत्तेचा माज, सत्तेतून पैसा आणि पैशातून नेत्यांची खरेदी, हा नवा पायंडा भाजपने महाराष्ट्रात सुरू केला आहे. जनतेच्या पैशांची लूट करून आमदार विकत घेण्याचा ट्रेंड अमित शहा यांच्यापासून सुरू झाला आहे. काँग्रेसची विचारधारा कधीही संपणारी नाही. नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस संपवण्याचा कितीही प्रण घेतला असला, तरी शेवटी ‘काँग्रेसमुक्त भारत’ ऐवजी ‘काँग्रेसयुक्त भाजप’च  झाली आहे. ज्या दिवशी आम्ही सत्तेत येऊ, त्या दिवशी संपूर्ण भाजपा खाली होईल. आज भाजपमध्येही पारंपरिक कार्यकर्ते आणि नेत्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे, मोठा उद्रेक सुरू आहे.

प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्यामुळे काँग्रेसचे विधान परिषदेतील संख्याबळ कमी होईल आणि विरोधी पक्षनेते पदावर याचा परिणाम होईल या पत्रकारांच्या प्रश्नावर  बोलताना पटोले म्हणाले की, महायुतीला खरंतर विरोधी पक्षनेतेपद द्यायचेच नव्हते. त्यांना लोकशाही मान्य नाही. ज्यांना संविधान मान्य नाही, अशा भाजपकडून लोकशाहीची अपेक्षा तरी कशी करायची? हे अधिवेशन विरोधी पक्षनेत्याशिवायच चालवण्यात आले. जनतेचे प्रश्न मांडणे आणि त्यावर उत्तर मिळवणे ही लोकशाहीची मूलभूत रचना आहे. इंदिरा गांधी यांच्या काळात फक्त दोन खासदार असतानाही विरोधी पक्षनेतेपद देण्यात आले होते, हा इतिहास आहे आणि तो लपवता येणार नाही. लोकशाहीला दोन चाके असतात एक सत्तेचे आणि एक विरोधी पक्षाचे, ही परंपरा भाजपने मोडीत काढली आहे. संख्याबळ हा मुद्दा नाही; लोकशाहीची जाण काँग्रेसने जपली, भाजपने नाही कारण भाजपला संविधानच मान्य नाही.

काँग्रेस पक्ष चिंतन करणार का, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता नाना पटोले म्हणाले की, याबाबत पक्षांतर्गत बैठक घेऊन सखोल चिंतन करण्यात येईल. ज्या चुका झाल्या असतील, त्या दुरुस्त करण्याचा आम्ही निश्चित प्रयत्न करू.

English
हिंदी सारांश
Web Title : Nana Patole slams BJP over Pragya Satav's resignation episode.

Web Summary : Nana Patole criticizes BJP for allegedly using money and power to lure leaders from other parties, calling Pragya Satav's resignation unfortunate. He accuses BJP of undermining democracy and disrespecting the constitution, alleging a trend of buying MLAs.
टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेसBJPभाजपा