शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

एकनाथ शिंदेंच्या केसमध्ये अनेक अडचणी, आमचे वेगळे; प्रफुल्ल पटेलांनी केले सुतोवाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2023 18:52 IST

एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांवर आपात्रतेची टांगती तलवार असताना तशीच कारवाई राष्ट्रवादीच्या अजित पवार गटावर होणार असल्याची चर्चा सुरु आहे.

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत उद्धव ठाकरेंना धक्का दिल्यानंतर वर्षभराने राष्ट्रवादीनेही त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत भाजपशी घरोबा केला. यामुळे एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांवर आपात्रतेची टांगती तलवार असताना तशीच कारवाई राष्ट्रवादीच्या अजित पवार गटावर होणार असल्याची चर्चा सुरु आहे. यावर प्रफुल्ल पटेल यांनी आज एकनाथ शिंदेंच्या प्रकरणावर भाष्य केले आहे. 

एकनाथ शिंदेंच्या केसमध्ये अनेक अडचणी आहेत, असे ते म्हणाले आहेत. आमच्या केसमध्ये तसे काही नाहीय. आमची केस पूर्ण वेगळी आहे, त्याचा शिंदेंच्या केसशी काहीही संबंध नसल्याचे पटेल म्हणाले आहेत. 

 राष्ट्रवादीची राष्ट्रीय मान्यता रद्द झाली आहे. 53 पैकी 43 आमदार आमच्यासोबत आहेत. विधान परिषदेतील 9 पैकी 6 आमदार सोबत आहेत. नागालँडमधील सर्व आमदार आमच्या सोबत आहेत. जेवढे प्रांताध्यक्ष आहेत ते केवळ नॉमिनेटड अध्यक्ष आहेत. माझ्या सहीने त्यांची नेमणूक करण्यात आली आहे. पक्षात निवडणुका झालेल्याच नाहीत. जिल्हा, राज्य आणि देशपातळीवरील अध्यक्ष एकत्र मिळून पक्षाच्या अध्यक्षाची निवड करतात, असे पटेल म्हणाले. 

शिंदेंच्या केसमध्ये आज काय झाले...शिवसेना शिंदे गटाच्या अपात्रतेवरील सुनावणी आज पार पडली, परंतू याचिकांवरील सुनावणीला काही मुहूर्त मिळत नाहीय असे चित्र आहे. सर्व याचिकांवर एकत्रित सुनावणी घ्यावी अशी मागणी ठाकरे गटाकडून लावून धरण्यात आली आहे. परंतू, विधानसभा अध्यक्षांनी पुढील तारीख दिली आहे. वाचा सविस्तर... 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेPraful Patelप्रफुल्ल पटेलShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारMaharashtra Political Crisisमहाराष्ट्रातील सत्तासंघर्ष