शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाच्या सत्तेने विदर्भवाद्यांच्या आशा पल्लवित

By admin | Updated: May 28, 2014 00:56 IST

केंद्रात भाजपाची एकहाती सत्ता आल्यामुळे विदर्भवाद्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. भाजपा सुरूवातीपासूनच छोट्या राज्यांचा सर्मथक आहे. त्यातच आता केंद्रात सत्ता आल्याने विदर्भ राज्य

आंदोलनाचा अँक्शन प्लॅन : गावोगावी करणार जनजागरण

संतोष अरसोड - यवतमाळ

केंद्रात भाजपाची एकहाती सत्ता आल्यामुळे विदर्भवाद्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. भाजपा सुरूवातीपासूनच छोट्या राज्यांचा सर्मथक आहे. त्यातच आता केंद्रात सत्ता आल्याने विदर्भ राज्य निर्मितीच्या प्रक्रियेला वेग येईल, असा सूर उमटू लागला आहे.

वेगळ्या विदर्भाची मागणी गेल्या अनेक वर्षापासूनची आहे. संयुक्त महाराष्ट्राचा मंगलकलश आला. मात्र विदर्भाच्या वाट्याला सतत उपेक्षाच आली. पश्‍चिम महाराष्ट्रातल्या नेत्यांनी विदर्भाला कधीच झुकते माप दिले नाही. विदर्भातील काँग्रेसच्या नेत्यांनी विदर्भाची बाजू कधीच लावून धरल्याचे दिसत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वेगळ्या विदर्भाच्या बाजूने होता. मात्र या विषयावर ते कधीच आक्रमक झाले नाहीत. अशातच तेलंगणा राज्य निर्मिती झाली आणि वेगळ्या विदर्भाच्या प्रश्नाने पुन्हा उचल खाल्ली. मागील वर्षी वेगळ्या विदर्भाच्या प्रश्नावर मतदान घेण्याचे अभिनव आंदोलन अमरावती, यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर आदी शहरात घेण्यात आले. या जनमत चाचणीत जनतेने उत्स्फूर्तपणे आपला सहभाग नोंदविला. शिवसेना वगळता अनेक महत्वाच्या राजकीय पक्षाच्या नेत्यांनी आपला सहभाग नोंदविला. या चाचणीने वेगळ्या विदर्भाच्या बाजूने कौल दिला. नागपूर अधिवेशना दरम्यान घेण्यात आलेली जनमत चाचणी आणि अभिरूप विधानसभा यामुळे खुद्द मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीसुध्दा विदर्भावर अन्याय होणार नाही अशी ग्वाही दिली होती.आता तर केंद्रात भाजपाचे सरकार आले आहे. त्यातच नितीन गडकरींसारख्या विदर्भवादी नेत्याची मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे. भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेच्या संयुक्त महाराष्ट्रवादी भूमिकेला आता पाहिजे तशी किंमत राहील असे वाटत नसल्यामुळे वेगळ्या विदर्भाचा मार्ग मोकळा होईल असे चित्र निर्माण झाले आहे. या वातावरणाचा फायदा घेऊन वेगळ्या विदर्भाची चळवळ पुन्हा जोर पकडणार आहे.