शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

महसूल विभागात 'पोस्टींग' युध्द सुरूच; ठाकरे सरकारकडून अनेक प्रांत, तहसीलदारांच्या मुदतपूर्व बदल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2020 14:11 IST

अनेक प्रांत, तहसीलदारांच्या मुदतपूर्व बदल्या

ठळक मुद्देकाही अधिकारी जाणार मॅटमध्ये 

सुषमा नेहरकर-शिंदे -पुणे : राज्यातील महाआघाडी सरकारने मोठ्या प्रमाणात महसूल विभागात प्रांत अधिकारी, तहसिलदार यांच्या बदल्या करत ग्रामीण भागात खांदेपालट करण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु या बदल्या होताना नेहमी प्रमाणेच " की पोस्टींग " मिळवण्यासाठी, आपल्याला हवे ते पद, जिल्हा, तालुका मिळविण्यासाठी मोठे 'पोस्टींग' युद्ध झाले आहे. यात अनेकांनी घोडेबाजार करत मुदतपूर्वच व आपल्याच सहकाऱ्यांना 'खो'  देत पोस्टींग पदरात पाडून घेतले आहे. शासनाने या बदल्या करताना अनेकांना एक-दोन वर्षांतच त्या पदावरून उचलून दुसरीकडे टाकले आहे. यामुळेच मुदतपूर्व बदली केलेले काही अधिकारी शासनाच्या विरोधात " मॅट" न्यायालयात जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.      राज्य शासनाने दोन दिवसांपूर्वीच पुणे विभागात सुमारे १४ उपजिल्हाधिकारी आणि २२ तहसिलदार यांच्या बदल्या केल्या आहेत. पुण्यात कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात येत नसल्याचे लक्षात आल्यानंतर उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी बहुतेक सर्व वरिष्ठ अधिका-यांच्या बदल्या केल्या. यात विभागीय आयुक्त पदापासून जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त आणि अन्य आयएएस  अधिका-यांचा समावेश होता. यात पवार यांनी बहुतेक सर्व महत्त्वाच्या जागांवर आपल्या स्टाईल ने काम करणारे अधिकारी बसवले. सत्तांतरानंतर आयएएस अधिका-यांच्या बदल्या करणे ही प्रत्येक राज्यातील नियमित प्रॅक्टिस समजली जाते. परंतु या महाआघाडी सरकारने थेड तहसिलदार,  उपजिल्हाधिकारी दर्जाच्या पदा पर्यंत खाली घसरले आहे. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा पुनर्वसन अधिकारी भारत वाघमारे यांच्यासह चिटणीस विवेक जाधव, तहसिलदार निवास ढाणे याच्या सह अन्य अनेक अधिकाऱ्यांच्या मुदतपूर्व बदल्या करण्यात आल्या आहेत. पुण्यात त्याही मुख्यालयात पोस्टींग मिळविताना आपल्याच सहकार्यांना खो देण्यासाठी काही अधिका-यांनी राज्यकर्त्यांना हाताशी धरून मोठे आर्थिक व्यवहार करत पद मिळवली आहेत. शासनाच्या या निर्णयाच्या विरोधात काही अधिकारी मॅट न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहेत. परंतु अनेकांनी लोकमतला सांगितले, आमच्यावर अन्याय झाला पण शासनाशी पंगा घेऊन काय करायचे.

टॅग्स :PuneपुणेTransferबदलीState Governmentराज्य सरकारRevenue Departmentमहसूल विभाग