हा तर पोस्टरबॉय!

By Admin | Updated: October 8, 2014 03:53 IST2014-10-08T03:53:39+5:302014-10-08T03:53:39+5:30

विनोद तावडे हे भाजपाचे पोस्टर बॉय असल्याची झोंबरी टीका तावडेंचे नाव न घेता मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज केली

This posterboy! | हा तर पोस्टरबॉय!

हा तर पोस्टरबॉय!

मुंबई : विनोद तावडे हे भाजपाचे पोस्टर बॉय असल्याची झोंबरी टीका तावडेंचे नाव न घेता मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज केली. चारकोप येथील सभेत बोलताना त्यांनी तावडेंची खिल्ली देखील उडवली.
इथे एक येडं उभयं... स्वत:चा मतदारसंघ सोडून आलायं. घर कुठे? उभा रहातोय कुठून... सगळी नौटंकी नुसती... पोस्टरबॉय आहे नुसता... अशा शेलक्या शब्दात बोलताना राज म्हणाले, यांच्या सभांना गर्दी होत नाही, यांचे एकायला कोणी येत नाही म्हणून नरेंद्र मोदी बीडच्या सभेत जे बोलले ते अगदी खरे होते. जर गोपीनाथ मुंडे असते तर आपल्याला एवढ्या सभा घेण्यासाठी येण्याची देखील गरज उरली नसती. मात्र यांच्याकडे गल्लीत सभा घेण्यासाठी देखील नेते नाहीत असेही राज यांनी सांगितले.
भाजपाचे विनोद तावडे विलेपार्ले भागात रहातात आणि विधानसभेसाठी मात्र त्यांनी सुरक्षीत मतदारसंघ म्हणून बोरीवलीची निवड केली. बोरीवलीतून तीनवेळा निवडून आलेले भाजपाचे हेमेंद्र मेहता यांच्यासह मनिषा चौधरी येथून उत्सूक होत्या. मात्र मेहतांना मागठाणेमधून उमेदवारी देत त्यांचा पत्ता कट केला गेला आणि मनिषा चौधरींना देखील दहिसरमध्ये पाठवण्यात आले. काटेकी टक्कर करुन निवडून यायचे होते तर तावडेंनी मागठाणे येथून मनसेचे प्रवीण दरेकर यांच्या विरोधात दंड का थोपटले नाहीत अशी प्रतिक्रीया भाजपाचे कार्यकर्ते व्यक्त करत आहेत.
शिवाय पार्ल्यातून आपल्याला उभे रहायचे आहे पण तो मतदारसंघ शिवसेनेकडे आहे असे सांगून तावडेंनी तेथून काढता पाय घेतला होता. पण युती तुटल्यानंतर पार्ल्याची जागा पराग अळवणीच्या गळ्यात बांधून तावडेंनी सुरक्षीत मतदारसंघ म्हणून बोरीवली गाठल्याची चर्चा पार्ल्यात देखील रंगलेली आहे.

Web Title: This posterboy!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.