पुण्यात पोस्टाने आली स्फोटके !

By admin | Published: July 13, 2015 02:04 AM2015-07-13T02:04:42+5:302015-07-13T02:04:42+5:30

येथील संभाजी ब्रिगेडच्या जिजाई प्रकाशनच्या कार्यालयाला टपालाद्वारे रासायनिक पावडर, अ‍ॅल्युमिनिअमचा रॉड तसेच धमकीचे पत्र पाठवण्यात आल्यामुळे खळबळ उडाली आहे

Post by explosives in Pune! | पुण्यात पोस्टाने आली स्फोटके !

पुण्यात पोस्टाने आली स्फोटके !

Next

पुणे : येथील संभाजी ब्रिगेडच्या जिजाई प्रकाशनच्या कार्यालयाला टपालाद्वारे रासायनिक पावडर, अ‍ॅल्युमिनिअमचा रॉड तसेच धमकीचे पत्र पाठवण्यात आल्यामुळे खळबळ उडाली आहे. संघटनेचे प्रदेश संघटक अजय भोसले यांच्या नावाने हे पार्सल पाठविण्यात आले असून, त्यात आमदार जितेंद्र आव्हाड, श्रीमंत कोकाटे आणि पत्रकार निखिल वागळे यांच्या नावांवर लाल रंगाच्या शाईने फुल्या मारण्यात आलेल्या आहेत. संघटनेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. बॉम्बशोधक व नाशक पथकाने ही पावडर तपासणीसाठी ताब्यात घेतली आहे. पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोस्टाने आलेल्या पार्सलवर स. प. महाविद्यालय पोस्ट आॅफिसचे शिक्के आहेत.

भोसले यांनी दिलेल्या माहितीनुसार, कन्या शाळेजवळ असलेल्या जिजाई प्रकाशनच्या पत्त्यावर टपालाद्वारे हे पार्सल शनिवारी पोहोचले. वारीच्या गडबडीमध्ये असल्यामुळे शनिवारी आलेले पार्सल रविवारी सकाळी उघडण्यात आले. प्लास्टिकच्या एका पुडीमध्ये पिवळसर रंगाची पावडर व त्यासोबत अ‍ॅल्युमिनिअमचा छोटासा रॉड होता. एका हिंदुत्ववादी दैनिकाच्या बातम्यांची तीन कात्रणे त्यात होती. श्रीमंत कोकाटे, जितेंद्र आव्हाड आणि निखील वागळे यांच्या नावाने प्रसिद्ध झालेल्या बातम्यांच्या या कात्रणांमध्ये तिघांच्याही नावांवर फुल्या मारलेल्या आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Post by explosives in Pune!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.