शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
2
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
3
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
4
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
5
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
6
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
7
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
8
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
9
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
10
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
11
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
12
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
13
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
14
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
15
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
16
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
17
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
18
पंकज भोयर वर्धेबरोबरच भंडाऱ्याचेही पालकमंत्री, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्रीपदी नियुक्ती
19
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
20
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 

ठाकरे बंधूंची संभाव्य युती, एकनाथ शिंदेंची वाढली डोकेदुखी; दिल्लीत शाह-शिंदे यांच्यात खलबते

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2025 05:35 IST

महापालिका निवडणुका लांबणीवर टाकण्याच्या पर्यायापासून अन्य विषयांवर उभयतांमध्ये चर्चा झाल्याचे समजते; भेटीदरम्यान निवडणूक रणनीतीवर चर्चा

अजित मांडकेठाणे - मागील आठवड्यात उद्धव व राज ठाकरे यांचा वरळीत मराठीच्या मुद्द्यावर विजयी मेळावा झाला. त्यामध्ये उद्धव यांनी राजकीय युतीचे संकेत दिले. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी सायंकाळी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीच्या महापालिका निवडणुकीवरील परिणामांबाबत चर्चा केली. भाजपनेही या संदर्भात काही खासगी संस्थांमार्फत सर्वेक्षण केले असून, त्याच्या निष्कर्षांची माहिती शाह यांनी शिंदे यांना दिली.

महापालिका निवडणुका लांबणीवर टाकण्याच्या पर्यायापासून अन्य विषयांवर उभयतांमध्ये चर्चा झाल्याचे समजते. भाजपचे लक्ष्य आता मुंबई महापालिका असून ठाकरे बंधू निवडणुकीत एकत्र आले तर त्याचे कसे परिणाम होतील, याबाबत भाजपच्या दिल्लीतील नेत्यांमध्ये चिंता आहे. भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी ठाकरे बंधूंना डिवचणारी विधाने केली. ठाकरे यांच्याविरोधात कठोर भूमिका घेतली तर काय परिणाम होतील? राज ठाकरे यांनी स्पष्टपणे उद्धव यांच्यासोबत युतीचे संकेत मेळाव्यात दिलेले नाहीत. राज यांचे मतपरिवर्तन करण्याची शक्यता किती आहे? 

ठाकरे बंधूंना लक्ष्य केले तर मुंबईतील हिंदी मतदार महायुतीच्या मागे उभा राहील का? मुंबई महानगर क्षेत्रातील महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या युतीचा सामना करण्याकरिता अन्य कोणकोणत्या पक्ष, नेत्यांना सोबत घेणे शक्य आहे, अशा विविध मुद्द्यांबाबत शाह व शिंदे यांच्यात चर्चा झाली.

राज यांच्या भूमिकेची घेतली माहिती

त्रिभाषा सूत्र लागू करण्याचा निर्णय शिंदेसेनेचे शिक्षण खात्याचे मंत्री दादा भुसे यांनी रेटला. त्यांनी राज यांची भेट घेऊन मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न झाला, मात्र त्यांना अपयश आले,  असेही सांगितले जाते. राज यांची भूमिका काय आहे, त्रिभाषा सूत्राला नेमका विरोध का व कुणाचा आहे, अशा बाबतीत शिंदे यांच्याकडून शाह यांनी माहिती घेतल्याचे सांगण्यात आले.

वाद टाळण्याचा दिला सल्ला 

शिंदेसेनेच्या काही मंत्री, आमदार यांच्या वक्तव्यामुळे, कृतीमुळे राज्यात वादंग झाले. महापालिका निवडणुका होईपर्यंत असे वाद टाळण्याचा आदेश शाह यांनी दिला.भाजपच्या काही मंत्र्यांनी या संदर्भात दिल्लीपर्यंत तक्रारी केल्या आहेत. महायुती एकसंध असल्याचा संदेश जाणे गरजेचे आहे, असे शाह यांनी सुनावल्याचे समजते.

शिंदे गुरुवंदनेकरिता दिल्लीत : विचारे

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गुरू बदललेले आहेत म्हणून ते दिल्लीला गेल्याची टीका उद्धवसेनेचे माजी खा. राजन विचारे यांनी गुरुवारी केली. आमचे गुरू येथे ‘मातोश्री’ला बसलेले आहेत, असेही त्यांनी सांगितले. गुरुपौर्णिमेनिमित्त विचारे यांनी शक्तिस्थळावर जाऊन शिवसेनेचे दिवंगत जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या स्मृतीला अभिवादन केले.

टॅग्स :Amit Shahअमित शाहEknath Shindeएकनाथ शिंदेRaj Thackerayराज ठाकरेUddhav Thackerayउद्धव ठाकरे