शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

येत्या २४ तासात महाराष्ट्रात अतिवृष्टीची शक्यता 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2018 21:28 IST

महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे़. पश्चिम विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे़.

ठळक मुद्देपश्चिम विदर्भात मुसळधार : मराठवाड्यात अनेक ठिकाणी पाऊस

पुणे : विदर्भात काही ठिकाणी मुसळधार तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस झाला़. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार तर कोकण, गोवा व मराठवाड्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला़. येत्या २४ तासात उत्तर कोकण, गोव्यात व उत्तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे़. पश्चिम विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे़. राज्यातील किनारपट्टी लगतचा अरबी समुद्र खवळलेला असल्याने मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे़. गुरुवारी सकाळी संपलेल्या २४ तासात कोकण, गोव्यातील वाल्पोई ८०, कणकवली, माथेरान ६०, मुल्दे, सांगे, ५०, कर्जत, फौंडा, सावंतवाडी ४० मिमी पावसाची नोंद झाली आहे़. बहुतांश ठिकाणी हलका पाऊस झाला़ मध्य महाराष्ट्रातील महाबळेश्वर १४०, बार्शी, सोलापूर ६०, गगनबावडा ५०, राधानगरी ४० मिमी पाऊस झाला आहे़ याशिवाय बहुतेक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी आल्या होत्या़ अनेक दिवस पावसाची आतुरतेने वाट पहात असलेल्या मराठवाड्यात बुधवारी बहुतांश ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली़ भूम, किनवट, माहूर, तुळजापूर ७०, औंढा नागनाथ, हिमायतनगर, लोहारा, परभणी ६०, हिंगोली, जळकोट ५०, धमार्बाद, गंगाखेड, हदगाव, केज, कळंब, कळमुनरी, मंठा, मानवत, पाथ्री, पूर्णा, सेनगाव, उमरगा ४० मिमी पावसाची नोंद झाली होती़ याशिवाय अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली होती़. विदर्भात लाखांदूर १३०, अहिरी, भद्रावती १२०, कोपर्णा ११०, भंडारा, ब्रम्हपुरी, चंद्रपूर ९०, बल्लाळपूर, गोंदिया, लाखानी, मुलदेरा, नागभिड ८०, अजुर्नी मोरगाव, चिमूर, देवरी, देसाईगंज, मूल, शिंदेवाही, तुमसर, उमरेड, वरोरा ७०, भिवपूर, धानोरा, गडचिरोली, जिवती, पौनी, साकोली, साली, सिरोंचा, यवतमाळ ६० मिमी पाऊस झाला असून या शिवाय अनेक ठिकाणी हलका पाऊस झाला आहे़ घाटमाथ्यावरील ताम्हिणी १५०, दावडी, डुंगरवाडी १३०, भिरा ९०, लोणावळा ८०, कोयना, शिरगाव ७०, अम्बोणे ६०, वळवण ५० मिमी पाऊस झाला होता़.सध्या मॉन्सून ओडिशा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, छत्तीसगड, आंध्र प्रदेश किनारपट्टी, तेलंगणा आणि कर्नाटकामध्ये सक्रीय आहे़.पुढील तीन दिवस प्रामुख्याने उत्तर कोकण, विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे़. १७ आॅगस्ट रोजी उत्तर कोकण, गोवा व उत्तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता असून पश्चिम विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे़. १८ आॅगस्ट रोजी उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे़. ़़़़़़़़़़़गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत जळगावात ११६ मिमी पावसाची नोंद झाली असून महाबळेश्वर ७३, मालेगाव २२, उस्मानाबाद ५८, औरंगाबाद ६६, परभणी ५१, अकोला १४, अमरावती ३४, ब्रम्हपूरी ९६, चंद्रपूर २३, यवतमाळ २४, डहाणु, पणजी ७, सोलापूर ७, मुंबई ३, सांताक्रूझ ६, रत्नागिरी ८ लोहगाव, पुणे ६ मिमी पावसाची नोंद झाली आहे़. 

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसMaharashtraमहाराष्ट्र