पूजा खेडकरला हायकोर्टाकडून मोठा धक्का, अटकपूर्व जामिनासाठीची याचिका फेटाळली, कुठल्याही क्षणी होणार अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2024 16:24 IST2024-12-23T15:38:34+5:302024-12-23T16:24:18+5:30

Pooja Khedkar News: बरखास्त ट्रेनी आयएएस अधिकारी पूजा खेडकरला दिल्ली हायकोर्टाने आज मोठा धक्का दिला आहे. ट्रायल कोर्टाच्या निर्णयाविरोधात पूजा खेडकर हिने दाखल केलेली याचिका हायकोर्टाने फेटाळून लावली आहे.

Pooja Khedkar gets a big blow from the High Court, her petition for interim bail was rejected, she will be arrested at any moment | पूजा खेडकरला हायकोर्टाकडून मोठा धक्का, अटकपूर्व जामिनासाठीची याचिका फेटाळली, कुठल्याही क्षणी होणार अटक 

पूजा खेडकरला हायकोर्टाकडून मोठा धक्का, अटकपूर्व जामिनासाठीची याचिका फेटाळली, कुठल्याही क्षणी होणार अटक 

बरखास्त ट्रेनी आयएएस अधिकारी पूजा खेडकरला दिल्ली हायकोर्टाने आज मोठा धक्का दिला आहे. ट्रायल कोर्टाच्या निर्णयाविरोधात पूजा खेडकर हिने दाखल केलेली याचिका हायकोर्टाने फेटाळून लावली आहे. ट्राल कोर्टाने पूजा खेडकर हिला अटकपूर्व जामीन देण्याचा नकार दिला होता. त्यानंतर पूजा खेडकर हिने या निर्णयाविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेत आव्हान दिले होते. मात्र ही याचिका फेटाळण्यात आल्याने आता पूजा खेडकर हिच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. तसेच तिला कुठल्याही क्षणी अटक होऊ शकते.

पूजा खेकर हिला ऑगस्ट महिन्यात अटकेपासून संरक्षण मिळालं होतं. मात्र आता दिल्ली उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे तिच्यासमोरील अडचणीत वाढ झाली आहे. आज झालेल्या सुनावणीत कोर्टाने सांगितले की, याचिकाकर्त्याचं आचरण हे समाजातील वंचित समुहांसाठीच्या योजनांचा लाभ घेण्याच्या उद्देशाने प्रेरित आहे. मात्र त्या वंचित समुहांसाठीच्या तरतुदींचा लाभ घेण्यास पात्र नसल्याचे तपासामधून दिसून येत आहे. आलिशान वाहनांचे मालक असण्याबरोबरच याचिकाकर्त्याचे आई-वडील प्रभावशाली आहेत, असं निरीक्षणही कोर्टाने नोंदवलं.

असं वाटतं की, पूजा खेडकर हिने उचलेली पावलं ही व्यवस्थेत फेरफार करण्याच्या एका मोठ्या कटाचा भाग होती. लाखो विद्यार्थी यूपीएसएसी परीक्षेसाठी उपस्थित असतात. या परिस्थितीत तिच्याकडून वापरण्यात आलेली रणनीती अनेक प्रश्न उपस्थित करते. फसवणुकीचं हे उदाहरण केवळ घटनात्मक संस्थाच नाही तर संपूर्ण समाजाची फसवणूक करणारे आहे, असे निरीक्षण दिल्ली हायकोर्टाने नोंदवले.

दरम्यान, या प्रकरणाचा अधिक तपास करण्यासाठी चौकशीची आवश्यकत आहे. तसेच याचिकाकर्त्याविरोधात एक भक्कम खटला उभार राहू शकतो, त्यामुळे ही याचिका फेटाळण्यात येत आहे, असे सांगत कोर्टाने पूजा खेडकर हिची याचिका फेटाळून लावली. पूजा खेडकर हिच्यावर फसवणूक करून यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाल्याचा तसेच ओबीसी आणि दिव्यांग कोट्याचा चुकीच्या पद्धतीने लाभ घेतल्याचा आरोप आहे.  

Web Title: Pooja Khedkar gets a big blow from the High Court, her petition for interim bail was rejected, she will be arrested at any moment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.