रोषमाळ गटासाठी २८ आॅगस्टला मतदान
By Admin | Updated: July 28, 2016 19:05 IST2016-07-28T19:05:38+5:302016-07-28T19:05:38+5:30
रोषमाळ बुद्रूक जिल्हा परिषद गटाच्या पोटनिवडणुकीसाठी २८ आॅगस्ट रोजी मतदान होणार आहे. ८ आॅगस्टपासून नामनिर्देशनपत्र स्विकारले जाणार आहे.

रोषमाळ गटासाठी २८ आॅगस्टला मतदान
नंदुरबार : रोषमाळ बुद्रूक जिल्हा परिषद गटाच्या पोटनिवडणुकीसाठी २८ आॅगस्ट रोजी मतदान होणार आहे. ८ आॅगस्टपासून नामनिर्देशनपत्र स्विकारले जाणार आहे.
धडगाव तालुक्यातील रोषमाळ बुद्रूक जिल्हा परिषद गटाचे सदस्य दिलीप पाटील यांचा मृत्यू झाल्याने ही जागा रिक्त झाली आहे. या रिक्त जागेवर निवडणूक आयोगाने पोटनिवडणूक लावली आहे. त्यामुळे राजकीय पक्षांमध्ये धावपळ सुरू झाली आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार ८ आॅगस्ट रोजी निवडणुकीची अधिसुचना जाहीर करण्यात येईल. त्याच दिवसापासून नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास सुरवात होणार आहे.
अंतिम तारीख १२ आॅगस्ट रोजी आहे. १६ आॅगस्ट रोजी सकाळी ११ वाजता नामनिर्देशनपत्रांची छाननी करण्यात येईल. त्याच दिवशी वैध उमेदवारांची यादी जाहीर होईल. २२ आॅगस्टपर्यंत माघारीची मुदत आहे. जेथे अपील असेल तेथे २४ आॅगस्ट ही मुदत राहणार आहे. २८ आॅगस्ट रोजी सकाळी साडेसात वाजेपासून मतदानास सुरुवात होईल. मतमोजणी २९ आॅगस्टरोजी होणार आहे.
दरम्यान, मतदार यादी १ आॅगस्ट रोजी जाहीर करण्यात येणार आहे.
१ आॅगस्टपर्यंत हरकती व सुचना दाखल करता येणार आहेत. ५ आॅगस्ट रोजी निवडणूक विभाग व निर्वाचक गणाच्या छापील मतदार याद्या अधिनियमाच्या कलम १३ खाली अधिप्रमाणीत करण्यात येईल.