शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
7
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
8
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
9
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
10
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
11
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
12
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
13
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
14
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
15
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
16
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
17
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
18
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
19
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
20
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?

काका-पुतण्यांतील राजकीय संघर्ष !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2019 05:48 IST

महाराष्ट्राला शाप भाऊबंदकीचा !

महाराष्ट्राच्या राजकारणात अगदी इतिहासकाळापासून भाऊबंदकीचा वाद आहे. पेशवाईच्या काळात तर काका-पुतण्यातील राजकीय संघर्ष टोकाला गेला. ‘काका, मला वाचवा’ म्हणून पळत येणा-या नारायणराव पेशवाने राघोबादादाला घातलेली हाक आजही राजकारणात दिली जाते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे-राज ठाकरे, भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे-धनंजय मुंडे, श्रीमंत अभयसिंहराजे भोसले-छ. उदयनराजे भोसले, अनिल देशमुख-आशीष देशमुख या काका-पुतण्यातील राजकीय संघर्ष महाराष्ट्रने पाहिला आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणातील काही काका-पुतणे यांच्यात जसा संघर्ष आहे, तशी काही जणांमध्ये अजुन तरी एकवाक्यता टिकून आहे. राज्याच्या आणि देशाच्या राजकारणावर आपली अमीट छाप पाडणारे शरद पवार यांनी पुतण्या अजित पवारांना राजकारणात आणले, पण आजवर कितीही कठीण प्रसंग आला तरी उभयतांनी नात्याची लक्ष्मणरेषा ओलांडली नाही. नाशकात छगन भुजबळ आणि समीर भुजबळ या काका-पुतण्यांचे नातेही असेच घट्ट आहे. दोघांनाही तुरुंगवारी घडली तरी, त्या वेदनेतही आपल्या नात्याची वीण त्यांनी उसवू दिली नाही. लातूरमध्ये स्व.विलासराव देशमुख यांचे पुत्र आ. अमित देशमुख आणि त्यांचे काका दिलीपराव देशमुख यांचेही नाते राजकारण विरहित राहिले आहे. काका-पुतणे दोघेही राजकारणात असले तरी त्यांनी आपल्या नातेसंबंधात राजकारण आडवे येऊ दिलेले नाही.

बीड जिल्ह्यात भाऊबंदकीमध्येच संघर्षबीड : बीड जिल्ह्यातील काका-पुतण्यातील राजकीय संघर्ष संपूर्ण महाराष्टÑाला सर्वश्रूत आहे. गोपीनाथ मुंडे आणि विधान परिषद विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे या काका-पुतण्यातील संघर्ष महाराष्टÑाने पाहिला आहे. आता धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे ह्या बहिण-भावात या संघर्षाने टोक गाठले आहे. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत परळीतून धनंजय यांना उमेदवारी न देता पंकजांना उमेदवारी मिळाली व त्या पहिल्यांदा आमदार झाल्या आणि इथेच कौटुंबिक कलहाची पहिली ठिणगी पडली, तिचे राजकीय कलहात रुपांतर झाले. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत या बहिण-भावाची कडवी लढत गाजली होती. पंकजांनी जवळपास २५ हजार मताधिक्याने धनंजय यांचा दणदणीत पराभव केला होता. यावेळीही अशीच लढत या पहावयास मिळणार आहे.

बीमध्ये रोहयो मंत्री जयदत्त क्षीरसागर आणि त्यांचे पुतणे संदीप क्षीरसागर यांच्यातील कलहही विकोपाला गेला आहे. बीड नगराध्यक्षपदासाठी डॉ.भारतभूषण आणि संदीपचे वडील रविंद्र क्षीरसागर या भावात लढत होऊन भारतभूषण विजयी झाले असले तरी त्यांचे पुतणे तथा संदीपचे लहान भाऊ हेमंत यांच्याकडे सभागृहात बहुमत होते. याच बहुमताच्या जोरावर हेमंत यांनी उपनगराध्यक्षपदी विराजमान होत आपल्या काकावर म्हणजे भारतभूषण आणि जयदत्त यांच्यावर मात केली होती.वाद इतका विकोपाला गेला की, जयदत्त क्षीरसागर यांना राष्ट्रवादीचा राजीनामा देऊन शिवसेनेत जावे लागले. आता संदीप हे राष्टÑवादीकडून इच्छुक असून त्यांची लढत काका जयदत्त यांच्याशीच होऊ शकते. गेवराईत सेनेला जागा सुटली तर माजी मंत्री बदामराव पंडित आणि त्यांचे पुतणे राष्टÑवादीचे माजी जि.प.अध्यक्ष विजयसिंह पंडित यांच्यात लढतीची शक्यता आहे.

खासदार काका विरुद्ध आमदार पुतण्या!अलिबाग- रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे आणि आमदार अवधूत तटकरे या काका-पुतण्यांमध्ये सध्या राजकीय शीतयुद्ध सुरु आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी शरद पवार यांनी तटकरे घराण्यातील भाऊबंदकीत समेट घडवून आणण्याचा प्रयत्न केला. मात्र काही कालावधीपुरतेच उभयतांमधील शीतयुद्ध शमले होते. अवधूत हा सुनील तटकरे यांचे थोरले बंधु अनिल तटकरे यांचा मुलगा आहे. सुनील तटकरे यांनीच अनिल तटकरे यांना विधान परिषदेवर तर अवधूत यांना श्रीवर्धन मतदारसंघातून निवडून आणले होते. तसेच वहिनी शुभदा तटकरे यांनाही रायगड जिल्हा परिषदेवर निवडून आणत महिला व बाल कल्याण सभापतीपद दिले होते. असे असतानाही दोन्ही भावातील संघर्ष काहीना काही कारणांनी उफाळून येतो.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवारsunil tatkareसुनील तटकरेDhananjay Mundeधनंजय मुंडेPankaja Mundeपंकजा मुंडे