शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

Holi Special: मातोश्री ते वर्षा व्हाया कृष्णकुंज; राजकीय धुळवडीचे रंग

By बाळकृष्ण परब | Updated: March 21, 2019 13:28 IST

राज्याच्या राजधानीतील विविध पक्षांची मुख्यालयं, राजकीय नेत्यांची निवासस्थानं इथं रंगलेली राजकीय धुळवड

गावची होळी घालून झाल्यानंतर मुंबईतली धुळवड आणि राजकीय रंगपंचमी अनुभवण्यासाठी आमचे मित्र बाळा गावकर खास मुंबईत आले होते. राज्याच्या राजधानीतील विविध पक्षांची मुख्यालये आणि नेतेमंडळींच्या निवासस्थानी सुरू असलेल्या रंगपंचमीचा कार्यक्रम पाहून परतल्यानंतर त्यांनी सांगितलेला धम्माल अनुभव येणेप्रमाणे... मुंबईतल्या होळीचा थाट तो काय वर्णावा. जिकडे तिकडे नुसती वेगवेगळ्या रंगांची उधळण! राजधानीला शोभेल असा गोंधळ! त्यातही मुंबई म्हटली की मराठी माणूस आणि शिवसेना यांचं एक वेगळंच नातं म्हणून सर्वात आधी मातोश्रीवरच्या होळीचा उत्सव डोळ्यात साठवण्याच्या इराद्याने आम्ही वांद्रेच्या दिशेने कूच केले. महापालिकेपासून केंद्रापर्यंत सत्तेत असल्याने इथल्या होळीमध्ये उत्साह होता. त्यात चार वर्षे चाललेल्या शिमग्यानंतर लोकसभा निवडणुकीपूर्वी पुन्हा एकदा युतीचे रंग उधळले गेल्याने येथील धुळवडीचा उत्साह द्विगुणित झालेला दिसत होता. सेनेचे दिल्लीतील मनसबदार पुन्हा एकदा खासदारकी निश्चित झाल्याचे मानून एकमेकांना रंगात न्हाऊ घालत होते. स्वत: पक्षप्रमुख जातीने आगतस्वागत करत होते. युवा आदित्य धनुष्यबाणासाऱखी पिचकारी घेऊन रंगपंचमी खेळत होते. इतर नेते मंडळी त्यांच्याकडून हौशीने रंगवून घेत होती.  तर राऊतकाका मी चार वर्षे मीडियात रोखठोक भूमिका घेऊन मोदी शहांच्या नावाने शिमगा केल्याने दिल्लीश्वरांना युती करणे कसे भाग पडले हे ठासून सांगत होते. त्यातच मातोश्रीवरची धुळवड आटोपून युतीच्या संयुक्त रंगपंचमीस जाण्यासाठी अनेकांची धावपळ सुरू होती. तिकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीनेही ऐक्य दाखवण्यासाठी एकत्रित होळी साजरी करण्याची जय्यत तयारी केली होती. थोडेसे रुसवेफुगवे असले तरी जो तो एकमेकांच्या चेहऱ्यावर रंग लावत होता. दादा, बाबा, अशोकराव आघाडीच्या रंगात रंगून गेले होते. एकाकी पडलेले विखे साहेब मात्र एका कोपऱ्यात बसून सगळे निर्विकारपणे बघत होते. राष्ट्रवादीचे थोरले साहेब आघाडीच्या धुळवडीस जातीने हजर होते. थोरल्या साहेबांनी लावलेल्या रंगाचा रंग क्षणाक्षणाला बदलत होता. त्यामुळे उपस्थित मंडळी अवाक होत होती. आघाडीच्या धुळवडीसाठी दिल्लीहून हायकमांडने खास विमानांच्या आकाराचे फुगे पाठवले होते. आघाडीचे नेते तिथे ठेवलेल्या एका पुतळ्यावर नेम धरून हे फुगे मारत होते. पण पोरं पळवणारी टोळी आसपास फिरत असल्याने बड्या नेतेमंडळींचा बराचसा वेळ लेकराबाळांवर नजर ठेवण्यात जात होता. मुला-नातवंडांना सांभाळा असे जितेंद्रभाऊ उपस्थिताना माईकवरून वारंवार सांगत होते. एकंदरीत अशा परिस्थितीमुळे आघाडीच्या होळीत काही केल्या म्हणावा तसा रंग भरत नव्हता. 

तिकडे शिवाजी पार्कजवळ दोन गुजरात्यांमुळे राजकीय नुकसानी झाल्याने संतप्त झालेले चित्रकार साहेब नुसता शिमगा करत होते. अधुन मधून त्यांच्याकडून होणाऱ्या शाब्दिक रंग उधळणीला उपस्थितांकडून जोरदार प्रतिसाद मिळत होता. बाजूला एक रेल्वे इंजिन एकाच जागी उभे राहून नुसतेच धडधडत होते. त्याच्या धुरामुळे वातावरणात एकप्रकारचा कोंदटपणा आला होता. पण हे इंजिन एकदा पळायला लागल्यावर कुणालाही ऐकणार नाही, असे उपस्थित मंडळी म्हणत होती. काही अंतरावर आमचे गाववाले असलेल्या दादांची स्वाभिमानी  धुळवड सुरू होती. पण तिकडे घरगुती मंडळीच जास्त दिसत होती. इतर छोट्या मोठ्या मंडळींनीही धुळवडचे कार्यक्रम आयोजित केले होते.

पण खरी धमाल सुरू होती ती केंद्रात आणि राज्यात सत्तेवर असलेल्या भाजपाच्या धुळवडीत. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी धुळवडीची खास व्यवस्था केली गेली होती. मुख्यमंत्री देवेनभाऊ, चंद्रकांतदादा वगैरे जातीने लक्ष ठेवून होते. इकडे सगळीकडे चौकीदार उभे केलेले दिसत होते. होळीच्या गाण्याऐवजी 'मै चौकीदार हूँ' म्हणत सगळे नाचत होते. कंबरेला पिस्तुलासारखी दिसणारी पिचकारी खोचलेले डँशिंग खान्देशी गृहस्थ इकडून तिकडून एकेका तरुणाला पकडून आणत त्याला भगव्या रंगात रंगवून काढत होते. त्यात सेनेच्या अर्जुनाने ताणलेला धनुष्यही पुन्हा मागे घेतला गेल्याने निश्चिंत झालेल्या रावसाहेबांच्या चेहऱ्यावर रंग उजळून निघाले होते. तिकडेही युतीच्या संयुक्त धुळवडीच्या कार्यक्रमाची लगबग सुरू होती. त्याचे विशेष निमंत्रण घेऊन सुधीरभाऊ मातोश्रीकडे रवाना झाले होते. तर धुळवडीचे किमान धावते निमंत्रण तरी मिळेल या आशेवर असलेले जानकर मामा, आठवले, सदाभाऊ, मेटेसाहेब दरवाजावर घुटमळून जात होते. हे असेच सुरू राहिले तर आम्ही स्वतंत्रपणे धुळवड साजरी करू, असा इशाराच जानकर मामांनी दिला. तर आठवलेंनीही यमक जुळवून शीघ्रकवितेमधून नाराजी व्यक्ती केली. एकंदरीत राजकीय धुळवडीमध्ये मैत्रीच्या रंगांऐवजी एकमेकांच्या नावाने सुरू असलेला शिमगा पाहून हे कधीच सुधरणार नाहीत, म्हणत मी परतीची वाट धरली. बाकीची हकीकत प्रत्यक्ष भेटल्यावर सांगेनच! तूर्तास हॅप्पी होली!!!(बुरा न मानो होली है) 

टॅग्स :HoliहोळीShiv SenaशिवसेनाPoliticsराजकारणBJPभाजपाMNSमनसेcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस