शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: राज्यात मतदानाला सुरुवात, मतदारांची केंद्रांवर गर्दी
2
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
3
राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
4
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
5
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
6
चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त! 
7
‘आप’ला चिरडण्याचे कारस्थान; भाजपने सुरू केले ‘ऑपरेशन ब्रूम’; केजरीवाल यांचा आरोप
8
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
9
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
10
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
11
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
12
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
13
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
14
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
15
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
16
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
17
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
18
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
19
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
20
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट

विखेंच्या शुभेच्छा, भुजबळांची फिरकी, खडसेंची मदत, विधानसभेत राजकीय टोलेबाजी

By अतुल कुलकर्णी | Published: June 25, 2019 4:33 AM

काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार यांची विरोधीपक्ष नेतेपदी निवड झाली तेव्हा सत्ताधारी बाकावर बसलेले माजी विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी वडेट्टीवार यांची गळाभेट घेत शुभेच्छा दिल्या आणि सभागृहाने या अनोख्या भेटीचे बाके वाजवून स्वागत केले.

- अतुल कुलकर्णीमुंबई : काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार यांची विरोधीपक्ष नेतेपदी निवड झाली तेव्हा सत्ताधारी बाकावर बसलेले माजी विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी वडेट्टीवार यांची गळाभेट घेत शुभेच्छा दिल्या आणि सभागृहाने या अनोख्या भेटीचे बाके वाजवून स्वागत केले.

या सभागृहाला विरोधीपक्ष नेत्यांची मोठी परंपरा आहे. याआधी या पदावर एकनाथ शिंदे, राधाकृष्ण विखे यांनी चांगले काम केले असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अभिनंदनपर भाषणात म्हणताच, छगन भुजबळ म्हणाले, पाच वर्षात तीन विरोधी पक्ष नेते झाले. आता वडेट्टीवारांनाही तिकडे नेऊ नका म्हणजे झाले... वरही हास्याचे फवारे उडाले. काँग्रेसचे विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात यांनी वडेट्टीवार यांच्याविषयी बोलताना विखे पाटील यांना नथीतून तीर मारला.
ते म्हणाले, विरोधी पक्षनेत्याने सक्षमपणे काम केले पाहिजे, त्याने सरकारची धोरणे बदलवण्यास भाग पाडले पाहिजे, जनमत बदलण्याची क्षमता त्यांच्यात असते... त्यांच्या या प्रत्येक विधानाचा विखेंच्या दिशेने जाणारा रोख पाहून सभागृह त्यांना जोरदार प्रतिसाद देत होते. खरी बॅटींग केली ती एकनाथ खडसे यांनी. विखे पाटलांनी या पदाचा आगळा वेगळा कार्यकाळ पार पाडला आहे. भाजपचे सरकार देशात आले त्यात राज्याच्या तेव्हाच्या विरोधी पक्ष नेत्याचाही खारीचा वाटा आहे असा चिमटाही खडसे यांनी काढला. विरोधी बाकावरुन सत्ताधारी बाकावर येणे, मंत्री होणे आणि सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन यांना हटवून तिसऱ्या नंबरची जागा मिळवणे याला भाग्य लागते, असेही खडसे म्हणाले.
खडसे यांना मंत्री का केले नाही हे खडसे आणि मुख्यमंत्र्यांनाच माहिती आहे, असे अजित पवार म्हणाले होते. त्यावर खडसे म्हणाले, आमच्या दोघांचे काय ते ठरलंय... त्यावर अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी जे काय ठरलंय ते आता सभागृहात सांगू नका... असा सल्ला दिला त्यावर मुख्यमंत्रीही आपले हसू आवरु शकले नाहीत. त्यावर जळगावचेच राज्यमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, जे काही आहे ते सांगून टाका, त्यावर खडसे यांनी ‘मी पण तेच म्हणतोय, तुमचं काय ठरलंय ते उध्दव ठाकरेंना विचारुन सांगून टाका...’ आणि त्यावर सभागृहात हास्याचा स्फोट झाला.महाजनांना परिसस्पर्शगिरीश महाजनांना मुख्यमंत्र्यांचा परिस स्पर्श झाला म्हणून ते इथे आहेत.त्यांना सगळं माहिती असतं असं ते दाखवतात. पण ते काही खरं नसतं, असे अजित पवार म्हणताच विधासभेत जोरदार हास्य फुलले.

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाVijay Vadettiwarविजय वडेट्टीवारcongressकाँग्रेसRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटील