शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

आगारातील बेकायदा वाहनांना पोलीस रोखणार

By admin | Updated: February 11, 2015 05:41 IST

एसटी आगार आणि स्थानक परिसरात घुसखोरी करुन बेकायदेशीरपणे प्रवासी वाहतुक करणाऱ्या वाहनांना रोखण्याचा निर्णय

मुंबई : एसटी आगार आणि स्थानक परिसरात घुसखोरी करुन बेकायदेशीरपणे प्रवासी वाहतुक करणाऱ्या वाहनांना रोखण्याचा निर्णय परिवहन विभागाकडून घेण्यात आला आहे. यासाठी जवळपास ५०० ते १००० पोलिसांची मदत घेण्यात येणार असल्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. यासाठी संबंधित विभागांकडे बोलणीही सुरु असल्याचे ते म्हणाले. यामुळे बेकायदेशीर वाहनांना आळा बसण्याबरोबरच एसटीचे उत्पन्नही वाढण्यास मदत मिळणार आहे. एसटी आगार आणि स्थानकाच्या २०० मीटर परिसरात बेकायदेशीरपणे वाहतूक करणाऱ्या वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. असे असतानाही खाजगी आणि अनधिकृत वाहतूक करणाऱ्या वाहनांकडून नियमांना पायदळी तुडवत आगार आणि स्थानक परिसरात घुसखोरी केली जाते. हे घुसखोर कमी भाड्याचे आमिष दाखवून प्रवासी वाहतुक करतात. याविषयी रावते म्हणाले, परिवहन विभाग, पोलीस आणि एसटीने एकत्र येऊन आपले अधिकार वापरले पाहिजे. आता या अनधिकृत आणि खाजगी वाहनांना आळा घालण्यासाठी आता ५०० ते १००० हजार पोलिसांची मदत घेण्यात येणार आहे. यासाठी संबंधित विभागाकडे मागणीही केली आहे. त्याचप्रमाणे या वाहनांना रोखण्यासाठी आरटीओंना कार्ड रिडींग मशिनही दिले जाणार आहे. यापुर्वी कारवाई करण्यात आलेल्या वाहनांची माहीती संबंधित विभागाकडे ठेवता येत नव्हती. पण आता या मशिनच्या मदतीने वाहन चालकाकडून यापूर्वी किती गुन्हे झाले आहेत ही आणि अशा अनेक माहीती याव्दारे साठवल्या जातील. त्याचा एसटी आगार आणि स्थानक परिसरात येणाऱ्या खाजगी आणि अनधिकृत वाहनांविरोधातही केला जावू शकतो, अशी माहीती त्यांनी दिली. (प्रतिनिधी)