शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

मुंडे प्रकरणातील तरुणीचा जबाब पोलिसांनी नोंदविला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2021 07:11 IST

या प्रकरणाचा तपास सहायक आयुक्त जोत्स्ना रासम यांच्याकडून चौकशी करण्यात येत आहे. सुमारे साडेपाच तास तिच्याकडे चौकशी करण्यात आली.

मुंबई : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप करून खळबळ उडवून देणाऱ्या तरुणीचा शनिवारी पोलिसांनी सविस्तर जबाब नोंदवून घेतला. पश्चिम उपनगरातील डी. एन.नगर सहायक पोलीस आयुक्तांकडे हा जबाब घेण्यात आला. आवश्यकता वाटल्यास तिला पुन्हा बाेलावण्यात येईल, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.या प्रकरणाचा तपास सहायक आयुक्त जोत्स्ना रासम यांच्याकडून चौकशी करण्यात येत आहे. सुमारे साडेपाच तास तिच्याकडे चौकशी करण्यात आली. धनंजय मुंडे यांनी आपला व्हिडिओ बनवून शारीरिक संबंध स्थापित केले, त्याबाबत आपण बहिणीला सांगण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, मुंडे यांनी दबाव टाकून दिशाभूल केल्याचे तरुणीने पाेलिसांना सांगितल्याचे समजते.

हेगडे, धुरी हे धनंजय मुंडे यांचे मित्र - तरुणीचा आराेपमाझ्यावर खोटे आरोप करणारे कृष्णा हेगडे, मनीष धुरी हे धनंजय मुंडे यांचे मित्र आहेत. माझ्यावर आरोप करून त्यांना मदत करीत आहेत, असा आरोप तरुणीने केला. पत्रकारांशी संवाद साधताना तिने तिच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले. भाजपचे नेते कृष्णा हेगडे यांचा मी आदर करते. ते माझ्याकडे कुठल्या नजरेने बघतात हे मला माहीत नाही. मनसेचे नेते मनीष धुरी यांना मी माझ्या अडकलेल्या अल्बमसंदर्भात भेटले होते. त्यानंतर ते मला दारू पिऊन कॉल रायचे, असा आरोप तरुणीने केला. दरम्यान, हेगडे यांच्याप्रमाणेच धुरी यांनी हे आराेप फेटाळून लावले.मुंडेंशी माझा फारसा परिचय नाही - कृष्णा हेगडे- मुंबई : धनंजय मुंडे यांना मी सहा, सात वर्षांपूर्वी केवळ एकदाच भेटलो हाेताे. ते माझे मित्र नाहीत की त्यांच्याशी माझा फारसा परिचयही नाही, त्यामुळे त्यांना मदत करण्याचा प्रश्नच येत नाही, असे भाजपचे नेते व माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी शनिवारी स्पष्ट केले. - त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, मुंडे यांच्याविरुद्ध तक्रार दिलेल्या तरुणीने आपल्यालाही मेसेज पाठवून अडकविण्याचा प्रयत्न केला होता, ही वस्तुस्थिती सर्वांसमोर यावी, पोलिसांनी सर्व बाजूंनी सखोल चौकशी करावी, यासाठी मी स्वतःहून तक्रार दिली आहे. हे राज्यातील पहिले राजकीय ‘मी टू’ प्रकरण असल्याचा दावा त्यांनी केला.

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीNCPराष्ट्रवादी काँग्रेस