शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील पोलिसांच्या सुट्ट्या रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2019 22:43 IST

सत्ताकारणाचा पोलिसांना फटका..

पुणे : राज्यात सरकार स्थापनेवरुन भाजपा आणि शिवसेनेत मोठ्या प्रमाणावर आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत़. याचबरोबर येत्या १० नोव्हेंबरला ईद ए मिलाद असल्याने या पार्श्वभूमी राज्यातील कायदा व सुव्यवस्थेत कोणतीही बाधा येऊन नये, यासाठी सर्व पोलिसांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत़. या संबंधितचे आदेश पोलीस महासंचालकांच्या कार्यालयातून आज रात्री सर्व पोलीस अधीक्षक, घटकप्रमुखांना देण्यात आले आहे़. सध्या सरकार स्थापन करण्यावरुन दररोज उलटसुलट बातम्या येत असून राज्यातील राजकीय वातावरण विशेषत: शिवसेना आणि भाजपामध्ये तणाव निर्माण झाला आहे़. भाजपाला सत्ता स्थापन करण्यासाठी राज्यपालांनी निमंत्रण दिल्यास राज्यात त्याविरोधात पडसाद उमटू शकतात, असा संशय व्यक्त केला जात आहे़. कोणाचेही सरकार सत्तारुढ झाले तरी त्याचे पडसाद राज्यात उमटण्याची शक्यता आहे़. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेला बाधा निर्माण होऊ नये, यासाठी सर्वांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत़. मुंबईत शनिवारी राज्यातील सर्व अति वरिष्ठ पोलीस अधिकाºयांची बैठक आयोजित करण्यात आली होती़. या बैठकीत राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेण्यात आला़. पोलीस अधीक्षक आणि घटक प्रमुखांनी बैठक आयोजित करण्यात आली होती़. या बैठकीत पुढील आदेश येईपर्यंत पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्या रजा रद्द कराव्यात असे सांगण्यात आल्याचे समजते़. या बैठकीनंतर रात्री उशिरा पोलीस महासंचालकांच्या कार्यालयातून रजा, सुट्ट्या रद्द करण्याचे आदेश पाठविण्यात आले आहे़. १० नोव्हेंबरला ईद ए मिलाद हा सण असल्याने सुट्ट्या रद्द कराव्यात असे कारण त्यासाठी देण्यात आले आहे़. याबरोबरच पुढील आठवड्यात अयोध्याबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येणार असल्याने यावेळीही राज्यभरात बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे़. त्यामुळे अयोध्येचा निकाल लागून राज्यातील परिस्थिती शांत राहीपर्यंत पोलिसांच्या रजा, सुट्ट्या रद्द करण्यात येण्याची शक्यता आहे़. 

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसBJPभाजपाShiv SenaशिवसेनाPoliticsराजकारण