दारु अड्डय़ांवर पोलिसांची कारवाई

By Admin | Updated: October 13, 2014 13:30 IST2014-10-13T13:26:39+5:302014-10-13T13:30:34+5:30

निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील अवैध दारु अड्डय़ांवर पोलिसांनी छापा घातला. जिल्ह्यात ९0 अड्डय़ांवर छापे घालून लाखो रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

Police action on liquor bars | दारु अड्डय़ांवर पोलिसांची कारवाई

दारु अड्डय़ांवर पोलिसांची कारवाई

अहमदनगर: निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील अवैध दारु अड्डय़ांवर पोलिसांनी छापा घातला. जिल्ह्यात ९0 अड्डय़ांवर छापे घालून लाखो रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. सर्वाधिक अवैध दारु अड्डय़ांवरील कारवाई श्रीगोंदा विभागात झाली आहे. 
त्याखालोखाल श्रीरामपूर, शिर्डी आणि कर्जत उपविभागांचा समावेश आहे. अवैध दारु विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगणे, तयार करणारी अड्डे पोलिसांनी लक्ष्य केली होती. अवैध दारु विक्रीवर पोलिसांची करडी नजर राहणार आहे. प्रचार संपल्यानंतर गावोगावी पोलिसांची खास पथके गस्त घालणार आहेत.
(प्रतिनिधी)

 

Web Title: Police action on liquor bars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.