सिडकोतील टवाळखोरांवर पोलिसांची कारवाई
By Admin | Updated: May 7, 2014 14:06 IST2014-05-07T01:37:51+5:302014-05-07T14:06:32+5:30
परिसरात दहशत पसरविणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन पोलीस उपआयुक्त डॉ. डी. एस. स्वामी यांनी नागरिकांना दिले.

सिडकोतील टवाळखोरांवर पोलिसांची कारवाई
सिडको : चौकाचौकांत उभे राहून टवाळखोरी करणाऱ्यांवर आज अंबड पोलिसांकडून कारवाई करण्यात आली. याबरोबरच चौकांत बैठका घेऊन पोलिसांनी नागरिकांशी संवादही साधला. परिसरात दहशत पसरविणार्यांवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन पोलीस उपआयुक्त डॉ. डी. एस. स्वामी यांनी नागरिकांना दिले.
सिडको तसेच परिसरातील मुख्य चौक तसेच शाळा व महाविद्यालयांसमोर गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारांनी दहशत पसरविण्याचा प्रकार सुरू केल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. या टवाळखोरांवर वचक रहावा तसेच नागरिकांच्याही मनातील भीती दूर व्हावी, यासाठी मंगळवारी पोलीस उपआयुक्त डॉ.स्वामी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्ही. डी. श्रीमनवार यांसह पोलीस कर्मचाऱ्यांनी मुख्य रस्त्यावर पायी फिरून टवाळखोरांवर कारवाई केली. उत्तमनगर, राजरत्ननगर, पवननगर, त्रिमूर्ती चौक यांसह परिसरात पोलिसांनी फिरून नागरिकांशी संवादही साधला.(वार्ताहर)
सामान्य नागरिकही साध्या वेशातील एक पोलीसच असतो. गुन्हेगारांची माहिती मिळाल्यास नागरिकांनी न घाबरता त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा.
- डॉ. डी. एस. स्वामी,
पोलीस उपआयुक्त, नाशिक