शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

#PMkiShaadi : संजय राऊतांकडून 'PM'च्या लग्नाचं आमंत्रण, लेकीच्या लग्नपत्रिकेची जोरदार चर्चा! 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2021 11:25 PM

#PMkiShaadi : संजय राऊत यांची कन्या पूर्वशी राऊत हिचा ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांच्याशी लग्न होणार आहे.

मुंबई: विरोधकांना सातत्यानं अंगावर घेणारे शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांच्या घरी सध्या लगीनघाई सुरू आहे. संजय राऊत यांची कन्या पूर्वशी राऊत हिचा ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांच्याशी लग्न होणार आहे. हा विवाह सोहळा उद्या म्हणजेच 29 नोव्हेंबर रोजी  पार पडणार आहे. 

दरम्यान, मुलीच्या लग्नाच्या निमित्तानं आयोजित संगीत कार्यक्रमात आज संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंसोबत ठेका धरला. या दोघांच्या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यांच्या डान्स चर्चेत आला. यातच आता या लग्नाची आमंत्रण पत्रिका जोरदार चर्चेत आली आहे. कारण, ही पत्रिका 'पीएम'च्या लग्नाचे आमंत्रण देत आहे.

उद्याच्या लग्न समारंभाआधी संगीत कार्यक्रम, हळदी समारंभ असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. पूर्वशी राऊत आणि मल्हार नार्वेकर या लग्न समारंभाला अनेक बड्या व्यक्तींना आमंत्रण देण्यात आले आहे. त्यासाठी छापण्यात आलेली ही लग्नपत्रिकाच सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. कारण या पत्रिकेच्या मुखपृष्ठावरील #PMkiShaadi (पीएम की शादी) असा हॅशटॅग टाकण्यात आला आहे.

#PMkiShaadi हॅशटॅग चर्चेतया लग्न पत्रिकेमध्ये पूर्वशी आणि मल्हार यांचे नाव इंग्रजीत आहे. पूर्वशी (Purvashi) या इंग्रीजी नावातील पी (P) तसेच मल्हार (Mahlar) या नावातील एम (M) या अक्षरांना घेऊन एक खास हॅशटॅग तयार करण्यात आलाय. या दोन्ही नावांच्या आद्यक्षरांना घेऊन लग्नपत्रिकेवर #PMkiShaadi असे छापण्यात आले आले. हा हॅशटॅग सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. तसेच, लग्नपत्रिकेचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतMumbaiमुंबई