“काँग्रेसनं निर्लज्जतेचा कळस गाठला; पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या केसालाही धक्का लावल्यास...”; देवेंद्र फडणवीस आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2022 03:49 PM2022-01-06T15:49:19+5:302022-01-06T15:49:52+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ताफा थांबवला जाईल आणि रास्ता ब्लॉक होईल असं जाणीवपूर्वक घडवण्यात आले असा आरोप भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.

PM Narendra Modi security breach: BJP Devendra Fadnavis Target Congress | “काँग्रेसनं निर्लज्जतेचा कळस गाठला; पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या केसालाही धक्का लावल्यास...”; देवेंद्र फडणवीस आक्रमक

“काँग्रेसनं निर्लज्जतेचा कळस गाठला; पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या केसालाही धक्का लावल्यास...”; देवेंद्र फडणवीस आक्रमक

Next

मुंबई – १५० वर्ष जुना पक्ष अशाप्रकारे राजकारणात खालच्या स्तराला गेले आहेत. कोट्यवधी लोकांचा आशीर्वाद पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाठिशी आहे. त्यामुळे त्यांच्या केसालाही धक्का लागू शकत नाही. पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांच्या सुरक्षेचा धोका पोहचवण्याचं षडयंत्र रचणारे आणि त्यांना समर्थन करणारे यांना देशातील जनता कधीच माफ करणार नाही अशा शब्दात राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडलं आहे.

मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पंजाबमध्ये जी घटना घडली ती अतिशय गंभीर आहे. देशातील वेगवेगळ्या राज्यात विविध पक्षांचे सरकार असतं. परंतु देशाच्या पंतप्रधानांच्या सुरक्षेशी अशाप्रकारे खेळ यापूर्वी कधीही पाहिला नाही. पंजाबमधील घटना ही विचारपूर्वक केल्याचा कट दिसून येतो. पंतप्रधानांचा दौरा असतो तेव्हा सुरक्षेबाबत काही नियमावली आहेत त्या तंतोतंत पाळाव्या लागतात. सुरक्षेच्या नियमांची पुस्तिका असते. त्या पुस्तिकेप्रमाणे राज्यातील सुरक्षा दल, केंद्राचे सुरक्षा दल यांनी समन्वयाने काम करावं लागतं. त्यामुळे राज्याला हे माहिती नाही हे होऊ शकतं असा आरोप त्यांनी केला.

तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ताफा थांबवला जाईल आणि रास्ता ब्लॉक होईल असं जाणीवपूर्वक घडवण्यात आले. १५ ते २० मिनिटं ताफा अडवण्यात आला. तिथून पाकिस्तानची बॉर्डर अतिशय जवळ आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जीव धोक्यात घालण्याचं काम पंजाबच्या सरकारने केले. या कठीण प्रसंगात मुख्यमंत्री फोनवर येण्यास तयार नाही त्यामुळे हे सगळं पूर्वनियोजित होतं. या घटनेचा आम्ही निषेध करतो. पंतप्रधानांच्या सुरक्षेबाबत जे काही घडलं ते देशाने गंभीरतेने घेतले पाहिजे. देशाच्या पंतप्रधानांवर हल्ला हा त्या व्यक्तीवर नसतो तर देशावर असतो. पंतप्रधानांच्या सुरक्षेत हलगर्जीपणा करणाऱ्या लोकांना कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

दरम्यान, काँग्रेसचे नेते पंतप्रधानांच्या सुरक्षेबाबत ज्यारितीने विधानं करताय ते पाहता निर्लज्जतेचा कळस आहे. अपरिपक्वता नेत्यांमध्ये दिसून येतो. १५० वर्ष जुन्या पक्षाच्या नेत्यांकडून अशी विधानं होतायेत. नरेंद्र मोदींवर जनतेचा आशीर्वाद आहे. त्यामुळे मोदींच्या केसालाही धक्का लागू शकत नाही. काँग्रेसचे नेते चोराच्या उलट्या बोंबा मारत आहेत. काँग्रेसचा खरा चेहरा लोकांसमोर आला आहे.

Web Title: PM Narendra Modi security breach: BJP Devendra Fadnavis Target Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.