शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनच्या धरतीवरून जगाला दिसणार 'पॉवर'; २० मित्र ट्रम्प यांचा खेळ बिघडवणार, खरा डाव चौघे टाकणार
2
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
3
बाजारासाठी 'अ'मंगळवार! सेन्सेक्स ८४९ अंकांनी कोसळला; 'या' ५ मोठ्या कारणांमुळे झाली ऐतिहासिक घसरण
4
पावसाचा तडाखा! खवळलेल्या व्यास नदीने प्राचीन पंजवक्त्र महादेव मंदिराला घेतलं कवेत; व्हिडीओ बघून अंगावर येईल काटा
5
Asia Cup 2025 : गोड बोलून संघाबाहेर काढलं? भारतीय क्रिकेटरची कोच गंभीरसंदर्भात 'मन की बात'
6
Nikki Bhati Case : निक्कीच्या नवऱ्याची होती गर्लफ्रेंड, तिच्याशी लग्न करणारच होता पण...; तेव्हाही केलेलं मोठं कांड!
7
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
8
जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय, सदावर्ते म्हणाले...
9
गुरुवारी गजानन महाराज स्मरण दिन २०२५: एका दिवसांत कसे कराल ‘श्री गजानन विजय’ ग्रंथ पारायण?
10
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
11
गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टचा पगार आगाऊ देणार, कोणाला मिळणार लाभ
12
जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा
13
दही की ताक... आरोग्यासाठी सर्वात बेस्ट काय? फायदे समजल्यावर व्हाल चकित
14
बुधवारी गणपती २०२५: १ गोष्ट अर्पण करा, पूर्ण पूजा सफल होईल; वर्षभर पुण्य, बाप्पा शुभच करेल!
15
कन्नौजचे अत्तर आणि अयोध्येच्या दीपोत्सवाने जिंकले मन, पर्यटन परिषदेत यूपी ठरले आकर्षणाचे केंद्र!
16
ब्यूटी पार्लर, इन्स्टा रिल्स की ३५ लाख हुंडा...काय आहे निक्कीच्या क्रूर अंतामागचं खरं कारण?
17
कॉस्मेटिक सर्जरीवर 'शालिनी'चं प्रामाणिक उत्तर; माधवी निमकर म्हणाली, "कितीतरी कलाकारांनी..."
18
RSS चे प्रार्थना गीत गायल्याने स्वकीयांकडून टीका; आता डीके शिवकुमार यांनी मागितली माफी
19
CM योगींच्या नेतृत्वात तयार झाले विक्रमी 39 कल्याण मंडपम्, आता दुर्बल कुटुंबांनाही धुमधडाक्यात करता येईल समारंभांचे आयोजन
20
रेल्वेत सेक्शन कंट्रोलर पदांसाठी भरती, जाणून घ्या पात्रता आणि निवड प्रक्रिया!

बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2024 17:19 IST

"एका बाजूला छत्रपती संभाजी महाराजांना मानणारे देशभक्त अन् दुसऱ्या बाजूला औरंगजेबाचे गुणगान गाणारे..."

PM Narendra Modi in Chhatrapati Sambhajinagar : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी विविध ठिकाणी प्रचारसभा घेत आहेत. आज छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या सभेतून पीएम मोदींनी पुन्हा एकदा काँग्रेससह विरोधकांवर जोरदार टीका केली. "महाराष्ट्रातील ही निवडणूक केवळ नवीन सरकार निवडण्यासाठीची निवडणूक नाही, या निवडणुकीत एकीकडे छत्रपती संभाजी महाराजांना मानणारे देशभक्त आहेत, तर दुसरीकडे औरंगजेबाचे गुणगान करणारे आहेत," असा घणाघात मोदींनी केला.

बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली"औरंगाबादचे नामकरण छत्रपती संभाजीनगर करण्याची मागणी सर्वप्रथम दिवंगत बाळासाहेब ठाकरेंनी केली होती. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार अडीच वर्षे सत्तेत होते, पण काँग्रेसच्या दबावाखाली या लोकांची नाव बदलण्याची हिंमत झाली नाही. महायुतीचे सरकार सत्तेवर येताच शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर करण्यात आले. बाळासाहेब ठाकरेंची इच्छा आम्ही पूर्ण केली," असा हल्लाबोल मोदींनी केला.

नामकरणाविरोधात हे लोक न्यायालयात गेले मोदी पुढे म्हणाले, "मी एकनाथ शिंदे सरकारला धन्यवाद देतो की, त्यांनी शहराचे नामकरण केले. संभाजीनगरची भूमी महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास सांगणारी भूमी आहे. याच औरंगाबादचे नामकरण छत्रपती संभाजीनगर केल्यानंतर काँग्रेस आणि आघाडीला दणका बसला. त्यामुळेच हा निर्णय रद्द करण्यासाठी त्यांचे नेते न्यायालयात गेले. या लोकांना छत्रपती संभाजी महाराजांना मारणाऱ्यांमध्ये आदर्श दिसतो. ते महाराष्ट्राच्या संस्कृतीच्या विरोधात आहेत." 

महायुती सरकारने मराठवाड्यात पाणी आणले"विठ्ठलाच्या भक्तांच्या सोयीसाठी आम्ही पालखी महामार्ग तयार केला आहे. आघाडीच्या लोकांनी महाराष्ट्राच्या समस्या वाढवण्याशिवाय काहीही केले नाही. मराठवाड्यात अनेक दिवसांपासून पाण्याचे संकट आहे, पण काँग्रेस आणि आघाडीचे लोक नेहमीच निष्क्रिय राहिले. महाविकास आघडीवाले पाण्याच्या थेंबा-थेंबसाठी अडचणी आणल्या. आपल्या सरकारमध्ये पहिल्यांदाच दुष्काळाविरुद्ध ठोस प्रयत्न सुरू झाले. वैतरणा आणि उल्हास खोऱ्यातून मराठवाड्याला पाणी दिले. देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात जलयुक्त शिवार योजना सुरू केली. त्यामुळे जल स्थर वाढला होता. पण मधल्या अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकाने पाणी योजना रोखल्या, जळ्युक्त शिवाराची योजना थांबवली," अशी टीकाही मोदींनी यावेळी केली.

आरक्षणाच्या मुद्द्यावरून काँग्रेसची कोंडीपीएम मोदी यांनी यावेळी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन काँग्रेसवर निशाणा साधला. ते म्हणाले, "काँग्रेसला वाटत होते की, ओबीसी आपापल्या जातींमध्ये विभागले जातील आणि या वर्गाची ताकद कमी होईल. या विचारानेच काँग्रेस पुन्हा सत्तेत येण्याचा विचार करत आहे. काँग्रेस सत्तेत आल्यास एससी, एसटी आणि ओबीसींचे आरक्षण बंद करेल. काँग्रेसचे राजकुमार परदेशात उघडपणे आरक्षण रद्द करणार असल्याचे सांगतात. काँग्रेस आणि आघाडी एससी, एसटी आणि ओबीसीमध्ये फूट पाडण्याचा कट रचत आहे. काँग्रेसचा अजेंडा आजही तोच आहे त्यामुळे गेली 10 वर्षे ओबीसी समाजाचे पंतप्रधान होणे त्यांना सहन होत नाही," अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Narendra Modiनरेंद्र मोदीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरcongressकाँग्रेसShiv Senaशिवसेना