शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

PM मोदी म्हणाले, काँग्रेस 'लूट की दुकान'; नाना पटोलेंचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2023 16:40 IST

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नरेंद्र मोदींच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले.

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) काल राजस्थानच्या बिकानेरमध्ये सभेला संबोधित करताना काँग्रेसवर भ्रष्टाचाराचे आरोप करत काँग्रेस ही ‘लुट की दुकान’ आणि ‘झूठ का बाजार’ असल्याचे म्हटले होते. त्यांची ही खोचक टीका राहुल गांधी यांच्या 'मोहब्बत की दुकान' कॅम्पेनला उद्देशून होती. आता पीएम मोदींच्या टीकेला महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

मीडियाला प्रतिक्रिया देताना नाना पटोले म्हणाले की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वत: 'झूट का बाजार' आहेत, आता हे देशातील जनतेपासून लपून राहिले नाही. मोदींकडे सध्या गोदी मीडिया आहे, या माध्यमातून त्यांना जेवढं फेकायचं असेल, त्यांनी तेवढं फेकावं. मूळात ते काँग्रेसबद्दल बोलत नव्हते तर ते स्वत:बद्दल बोलत होते".

काय म्हणाले होते नरेंद्र मोदी? भ्रष्टाचारात राजस्थान पहिल्या क्रमांकावर आहे. केंद्रातून पाठवलेला पैसा काँग्रेसच्या तावडीत येतो. काँग्रेस हा असा पक्ष आहे की, जो सत्तेत राहून देश उद्ध्वस्त करतो आणि सत्तेतून बाहेर पडल्यावर देशाबाहेर जाऊन देशाची बदनामी करतो. भारतीय सैन्य सर्जिकल स्ट्राइक करते, तेव्हा काँग्रेसचे लोक पुरावे मागतात. त्यांना सैन्याचे काम आवडत नाही. राजस्थानची भूमी ही सैनिकांची भूमी आहे, त्याचीही बदनामी करतात. काँग्रेस ही ‘लुट की दुकान’ आणि ‘झूठ का बाजार’ आहे, अशी टीका मोदींनी केली होती.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसBJPभाजपा