शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मोदींना 'ट्राय' केलंत, ते नापास झालेत; आता काँग्रेसला संधी द्या!- राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2018 17:06 IST

विविध मुद्यांवरुन राहुल गांधींची पंतप्रधान मोदींवर सडकून टीका

वर्धा: नरेंद्र मोदींना तुम्ही संधी दिलीत. त्यांना ट्राय केलंत. मात्र ते नापास झाले. आता काँग्रेसला एक संधी द्या, असं आवाहन राहुल गांधींनी देशवासीयांना केलं आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त वर्ध्यातील सेवाग्राम आश्रमात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. यानंतर राहुल गांधींनी भाषण केलं. यावेळी त्यांनी विविध मुद्यांवरुन पंतप्रधान मोदींवर सडकून टीका केली. गेल्या काही दिवसांपासून राफेल डीलच्या मुद्यावरुन राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींवर सतत टीका केली आहे. वर्ध्यातही राहुल यांनी राफेल विमान खरेदीवरुन मोदींना लक्ष्य केलं. राफेल विमान खरेदीबद्दल मोदी नजरेला नजर भिडवून बोलत नाहीत. मोदींनी देशाच्या जनतेच्या नजरेला नजर भिडवून राफेल विमान खरेदीबद्दल बोलावं, असं आव्हान त्यांनी दिलं. रोजगार, हमीभाव, काळा पैसा याबद्दल मोदींनी दिलेली सर्व आश्वासनं हवेत विरली आहेत. तुम्ही मोदींना संधी दिलीत. ते नापास झाले. आता काँग्रेसला संधी द्या, असं आवाहन यावेळी राहुल यांनी केलं. राहुल गांधींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे-

- शेतमालाला योग्य दर मिळण्याचं मोदींचं आश्वासन हवेत विरलं- मोदींनी जनतेला दिलेली आश्वासनं पाळली नाहीत- अनिल अंबानींकडे विमान निर्मितीचा अनुभव नाही, तरी त्यांना राफेलचं कंत्राट- अंबानींनी कोणत्या विमानाची निर्मिती केली?- पीएम भाषणातून जातीय तेढ निर्माण करतात- मोदींनी जनतेच्या खिशातला पैसा अंबानींना दिला- लाल किल्ल्यावरुन मोदींनी देशाचा अपमान केला- मोदींनी तुम्हाला काळ्या पैशाविरोधात लढण्यासाठी रांगेत उभं केलं, त्यावेळी श्रीमंत उद्योगपती कुठे होते?- तुमच्याकडचा पैसा मोदींनी हिसकावून घेतला- नोटाबंदीनंतर बँकांसमोरील रांगेत किती सूटबूटवाले होते, नीरव, ललित, माल्ल्या रांगेत दिसले का?- मोदी चौकीदार नव्हे भागीदार- मोदी उद्योगपतींची चौकीदारी करतात- तरुणांना फुकटात काही नको, त्यांना रोजगार हवा

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीRafale Dealराफेल डीलFuel Hikeइंधन दरवाढFarmerशेतकरी