शहरं
Join us  
Trending Stories
1
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
2
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
3
'या' देशाने मंत्रिमंडळात आणला AI मंत्री ! राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रयोग
4
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
5
वर्गमित्रांचा प्रताप! झोपेत असताना डोळ्यात टाकलं फेविक्विक; ८ विद्यार्थ्यांचे चिकटले डोळे अन्...
6
पत्नीला ५ गोळ्या घातल्या, क्राइम सीनवरून फेसबुक लाईव्ह केलं; पती म्हणाला, "हिचे बॉयफ्रेंड पळून गेले..." 
7
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
8
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
9
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात जन्मलेल्या बाळांचे भविष्य कसे असते? शुभ की? ज्योतिष शास्त्राने केला उलगडा!
10
४०००० कोटींचे उत्पन्न, ७० लाख नोकऱ्या; नितीन गडकरींनी दिला कमाईचा नवा मंत्र, कुणाला फायदा?
11
उमेश सहकलाकार नसता तर मी हा सिनेमा केला नसता, प्रिया बापटने सांगितलं कारण
12
२, ३, ४BHK घर बांधायचेय? जीएसटीचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या
13
गर्लफ्रेंडने ब्लॉक केलं, प्रेमभंग जीवावर बेतला, तरुणाने उचलले टोकाचे पाऊल; उपचारादरम्यान मृत्यू
14
१०% नं घसरलाय हा शेअर, पण अजूनही IPO च्या किंमतीपेक्षा ६०% नं अधिक; काय म्हणाले एक्सपर्ट?
15
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
16
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
17
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
18
अंकिता लोखंडेचा नवरा रुग्णालयात दाखल; हाताला ४५ टाके अन्... मित्राने शेअर केली पोस्ट
19
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल
20
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?

...म्हणून पंतप्रधान मोदींचा पुणे दौरा ठरला वेगळा अन् विशेष

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2020 11:01 IST

पंतप्रधानांचा मोदींचा 'अराजकीय' दौरा; दौऱ्यातून पक्ष आणि नेते ‘वजा’

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा पूर्णपणे  ‘अराजकीय’ ठरला. विमानतळावर स्वागताला जाण्याची राजकीय पदाधिकाऱ्यांची परंपरा मोडीत निघाली. पंतप्रधान कार्यालयाकडूनही याबाबत  ‘प्रोटोकॉल’ पाठविण्यात आलेला नव्हता. त्यामुळे अनेकांना इच्छा असूनही या स्वागताला जाता आले नाही. मात्र, खासदारांसह अनेकांनी मोदींच्या स्वागताचे जुने फोटो असलेले फलक शहरात झळकाविले. तर, बहुतांश पदाधिकारी व नेत्यांनी त्यांचे जुने फोटो सोशल मीडीयावर अपलोड करुन  ‘व्हर्चुअल’ स्वागत केले.पंतप्रधान मोदी यांनी शनिवारी पुण्यातील सिरम इन्सिट्यूटला भेट दिली. कोविड लसीची माहिती घेण्यासाठी आलेल्या मोदींच्या स्वागताला विमानतळावर विभागीय आयुक्त, पोलीस महासंचालक, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त यांच्यासह विमानतळ प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित होते. एकही राजकीय नेता या स्वागताला उपस्थित नव्हता. याबाबत भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष म्हणाले, पुण्यामध्ये कोरोनावर लस तयार होते आहे. त्याची पाहणी करण्यासाठी पंतप्रधान पुण्यात आले होते. ही पुणेकरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. कार्यकर्ते व नेत्यांनी मोदींनी ठरवलेल्या दौऱ्याच्या नियोजनाचा मान राखला. सोशल मिडीया आणि बॅनर लावत आपापल्या पद्धतीने स्वागत केले. यामध्ये गैर काही नाही.मोदींनी दौ-यामध्ये राज्यपाल, मुख्यमंत्री, महापौर, खासदार, आमदार यांपैकी कोणीही स्वागताला येऊ नये कळविले होते. स्वागताची ‘लाईनअप’ टाळण्याकरिता सूचना देण्यात आलेल्या होत्या. त्यामुळे भाजपाकडून पक्षीय पातळीवरही याबाबत कोणत्याही सूचना देण्यात आलेल्या नव्हत्या. पक्षाचे नेते असलेले पंतप्रधान पुण्यात येताहेत म्हटल्यावर खासदार गिरीश बापट यांनी त्यांच्या स्वागताचे जुने फोटो असलेले फलक शहरात लावले. तर, आमदार माधुरी मिसाळ यांचे मोदींना गणेश मूर्ती भेट देतानाचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाले. यासोबतच काही पदाधिका-यांनीही त्यांचे जुनेच फोटो पोस्ट करत मोदींचे स्वागत असे मेसेज टाकले.या संपूर्ण दौऱ्यामध्ये एकाही राजकीय नेत्याला किंवा पदाधिकाऱ्याला न भेटता मोदी दौरा पूर्ण करुन निघूनही गेले. यापूर्वी मोदी पुण्यात आले तेव्हा त्यांच्या भोवती राजकीय नेत्यांची मांदियाळी होती. परंतु, शनिवारचा दौरा पूर्णपणे अराजकीय ठरला.पीएम ऑफिसकडून आमच्याकरिता प्रोटोकॉल नव्हता. दौऱ्याची रुपरेषा ठरलेली होती. त्याप्रमाणे सर्व वागले. यामध्ये राजकीय व्यक्तींना भेट घेता आली नाही हे खरे असले तरी  कोरोनावरील लस हा महत्वाचा विषय आहे. पुण्यात लस तयार होत असल्याने पंतप्रधानांचा दौरा पुणेकरांना अभिमानास्पद आहे.- मुरलीधर मोहोळ, महापौरपंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे दौरा पूर्णपणे शासकीय दौरा होता. त्यामुळे पक्षाकडून स्वागताला जाण्याचा प्रश्नच येत नाही. संपुर्ण जगाचे लक्ष लागलेल्या लसीच्या पाहणीकरिता मोदी आले होते. त्यामुळे त्यामध्ये राजकीय व्यक्ती असणे अपेक्षितच नव्हते. पीएम कार्यालयाने घेतलेला निर्णय योग्य आहे.- चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष, भाजपा

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा