शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस सोडायची वेळ का आली? संग्राम थोपटेंनी यादीच वाचली; भाजपा प्रवेशाची तारीखही सांगितली
2
वक्फ कायद्याविरोधात AIMPLB चा 'ब्लॅकआउट' प्लॅन...; हैदराबादमध्ये मुस्लीम नेते-धर्मगुरू एकवटले, ओवेसी म्हणाले आम्ही...!
3
जेनसोलच्या पुण्यातील प्लाँटमध्ये एनएसईचा अधिकारी पोहोचला; होते फक्त तीन मजूर, परिस्थिती पाहून...
4
१ मेपासून फास्टॅग फाडून टाकणार? सॅटेलाईटवर टोल कापला जाणार; NHAI पहा काय म्हणतेय...
5
Video : दोन्ही फलंदाज नॉन स्ट्राइक एन्डला! Run Out चा डाव साधल्यावर कोहलीनं 'गॉगल' काढला, अन्...
6
राज ठाकरेंशी युती करण्याची चर्चा ठाकरे गट शिवतीर्थावर जाऊन करणार का? संजय राऊत म्हणाले...
7
'हलक्यात घेऊ शकत नाही' चेन्नईविरुद्धच्या सामन्याआधी रोहितचा मुंबईला इशारा, धोनीबाबत म्हणाला...
8
मोदी-नितीश फक्त सत्तेसाठी एकत्र; मल्लिकार्जुन खरगेंचा BJP-JDU युतीवर निशाणा
9
“हिंदीची सक्ती नकोच”; मनसेची थेट RSSकडे धाव, मोहन भागवतांना खुले पत्र, नेमकी काय मागणी केली?
10
रणजीत कासलेंना निवडणुकीत परळीला ड्युटीच नव्हती; प्रशासनाकडून निवडणूक आयोगाला अहवाल
11
दररोज ४५ रुपये गुंतवून लखपती व्हा; LIC च्या 'या' योजनेत तुम्हाला विमा आणि बोनसही मिळतो
12
सेक्सटॉर्शन, तरुणाचे अश्लील फोटो व्हायरल ! महिलेसह दोन अनोळखी व्यक्तींवर गुन्हा
13
अजित पवारांचे हेलिकॉप्टर बिघडले, राष्ट्रवादीचा मेळावा रद्द; कार्यकर्त्यांमध्ये रंगली वेगळीच चर्चा
14
विजेच्या धक्क्याने तडफडत होता मुलगा, लोकांची जवळ जाण्याची होत नव्हती हिंमत, तेवढ्यात एक तरुण धावला आणि...  
15
१० हजारांच्या आत AI, ५जी फोन; सेल्फी कॅमेरा ८ मेगापिक्सलचा पण चकीत केले; कसा आहे A95?
16
“जनतेने नाकारल्यामुळे ठाकरे बंधूंना आता एकत्र येण्याची गरज वाटतेय”; भाजपाचा खोचक टोला
17
इकडून सोने टाका अन् तिकडून पैसे काढा.. सोने खरेदी-विक्रीसाठी बाजारात आलंय ATM
18
शर्मिष्ठा राऊतच्या घरी पाळणा हलला! लग्नानंतर ४ वर्षांनी अभिनेत्री झाली आई, थाटामाटात केलं बारसं
19
भारतीय संशोधकांनी लावलेल्या शोधाचा चीनने घेतला लाभ, अमेरिका, रशियाही अवाक्, भारताने संधी दवडली  
20
दुर्दैवी! टॅम्पोचा अपघात; मदत करण्याऐवजी तेल लुटण्यासाठी उडाली झुंबड, क्लिनरचा जागीच मृत्यू

'PM मोदींनी कधीच संविधान वाचले नाही, त्यामुळे त्यांना ते कळणार नाही,' राहुल गांधींचे टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2024 15:27 IST

'या संविधानात गरीब, दलित, मागासवर्गीय, आदिवासींचा आवाज आहे.'

Rahul Gandhi in Nandurbar : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी आज नंदुरबारमध्ये जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी राहुल गांधींन संविधान, आरक्षण आणि आदिवासींचा मुद्दा उपस्थित करत पुन्हा एकदा भाजप आणि केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. 'ही निवडणूक दोन महत्त्वाच्या विचारधारांची लढाई आहे. राज्यघटनेने देश चालवा, असे काँग्रेस-आघाडीचे म्हणणे आहे, तर पीएम मोदी अन् भाजपवाले या संविधानाला कोरे/रिकामे म्हणतात,' अशी टीका राहुल यांनी केली.

यावेळी राहुल गांधींनी थेट पंतप्रधानांवर निशाणा साधला. ते म्हणाले, हे संविधान कोरे नाही, यात गरीब, दलित, मागासवर्गीय, आदिवासींचा आवाज आहे. नरेंद्र मोदींनी संविधान कधी वाचलेच नाही, त्यामुळे त्यांना हे कोरे दिसते, असा टोलाही राहुल गांधींनी लगावला.

रंगाने काय फरक पडतो?राहुल गांधी नेहमी लाल रंगाचे संविधान हातात घेऊन फिरतात, त्यावरुन झालेल्या टीकेवर राहुल यांनी प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, भाजपवाले म्हणतात की, मी नेहमी लाल रंगाचे संविधान दाखवतो. पण मी म्हणतो की, संविधानाच्या रंगापेक्षा, त्यात काय लिहिले आहे, हे जास्त महत्त्वाचे आहे. कव्हरच्या रंगाने आम्हाला काही फरक पडत नाही, पण त्यामध्ये काय लिहिले आहे, त्याच्या रक्षणासाठी आम्ही प्राणाची आहुती देण्यास तयार आहोत, हे आमच्यासाठी महत्वाचे असल्याचेही राहुल गांधी म्हणाले.

'आदिवासी म्हणजे वनवासी नाही'काँग्रेस खासदार राहुल गांधी म्हणाले की, मी जे संविधान रॅलीमध्ये दाखवतो, ते कोरे नाही. त्यात बिरसा मुंडा, शाहू, फुले, आंबेडकर, भगवान बुद्ध, गांधीजींचे विचार आहेत. या संविधानात भारताचे ज्ञान, देशाचा आत्मा आहे. त्यात सर्वसामान्यांचा आवाज आहे. आदिवासी म्हणजे भारतातील पहिले रहिवासी, त्यांचा जल, जंगल आणि जमीनीवर हक्क आहे. त्यासाठी बिरसा मुंडा यांनी इंग्रजांशी लढा दिला. संविधानात आदिवासी हा शब्द लिहिलेला आहे, पण भाजप-आरएसएसचे लोक त्याला वनवासी म्हणतात, आदिवासी नाही. आदिवासी आणि वनवासी यांच्यात मोठा फरक आहे, अशी टीकाही त्यांनी केली. 

कोरोना काळात केलेली व्हॅक्सीनची मदत; 'हा' देश PM मोदींचा सर्वोच्च पुरस्काराने करणार सन्मान

जात जनगणनेसाठी आवाज उठवलायावेळी राहुल गांधींनी पुन्हा एकदा जात जनगणनेचा मुद्दा उपस्थित केला. आदिवासींच्या कल्याणासाठी केलेल्या सर्व योजनांमध्ये त्यांचा किती सहभाग आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तसेच, देशाच्या संपत्तीवर आदिवासींचा हक्क आहे, पण त्यांचा सहभाग किती? जात जनगणना झाल्यावर हे कळेल, असे राहुल म्हणाले. यादरम्यान राहुल गांधींनी महाराष्ट्र सरकारवरही हल्लाबोल केला. ते म्हणाले की, महाराष्ट्र सरकार येथील प्रकल्प इतर राज्यात पाठवते, त्यामुळे येथील लोकांना नोकरीसाठी इतर राज्यात जावे लागते. हे सर्व जोडले तर महाराष्ट्र सरकारने सुमारे 5 लाख नोकऱ्या हिसकावून घेतल्याचेही टीकाही त्यांनी केली.

 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Rahul Gandhiराहुल गांधीnandurbar-pcनंदुरबारcongressकाँग्रेसBJPभाजपा