शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआचे उमेदवार अजित पवारांच्या पाया पडले, दादा अवघडले; पंगतीला बोलणेही टाळले
2
बस झालं, हार्दिक पांड्याला पूर्वीसारखं महत्त्व देण्याची गरज नाही; इरफान पठाण संतप्त 
3
'डिप्रेशनमध्ये मी तेव्हा आयुष्य संपवून टाकणार होतो'; जो बायडेन यांचा धक्कादायक खुलासा
4
IPL 2024 DC vs MI: मुंबईने टॉस जिंकला! हार्दिकने रिषभच्या मनासारखा निर्णय घेतला, पृथ्वीला विश्रांती
5
अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केले ५३ पानी उत्तर, EDच्या आरोपांचा घेतला समाचार
6
' माझी कामं स्वतःच्या प्रचार पुस्तिकेत छापली'; सुप्रिया सुळेंची नक्कल करत अजित पवारांची टीका
7
सिट्रॉएन, महिंद्रानंतर होंडाची बारी; अमेझला 2019 मध्ये 4 स्टार, 2024 मध्ये दोन स्टार
8
T20 WC 2024: हर्षा भोगलेंनी निवडला भारतीय संघ; KL राहुलला वगळलं, नव्या चेहऱ्यांना संधी
9
"शिवरायांच्या गादीविरोधात प्रचार करण्यासाठी मोदी कोल्हापुरात’’, संजय राऊत यांची बोचरी टीका 
10
रत्नागिरी: प्रचार ऐन रंगात आला, अन् ठाकरेंच्या जिल्हा प्रमुखाला तडीपारीची नोटीस
11
FD Vs NSC: नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट की ५ वर्षांची एफडी; ₹२ लाखांच्या गुंतवणूकीवर कुठे जास्त फायदा?
12
ऑनलाइन केक मागवला पण OTP देणे पडले महागात; खाते झाले रिकामे, नेमकं झालं काय?
13
काँग्रेसचा प्रचार यापुढे करणार नाही, नसीम खान यांची घोषणा; मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का!
14
Crypto Investment : लोकांमध्ये पुन्हा Cryptocurrency ची क्रेझ, का वाढतंय आकर्षण?
15
'विशाल पाटलांबाबतची खेळी जयंत पाटलांकडून'; भाजपच्या माजी आमदाराचा खळबजनक दावा
16
एकनाथ शिंदेच जणू! महेश मांजरेकरांच्या 'जुनं फर्निचर' मधील या अभिनेत्याला ओळखलंत का?
17
Vastu Shastra: पाण्याचा माठ, टाकी घराच्या 'या' दिशेला असेल तर; पाण्यासारखा वाया जाईल पैसा!
18
शाहू महाराज एका पक्षाच्या दावणीला बांधले गेले; मोदींच्या सभेपूर्वी राजेश क्षीरसागरांचा हल्लाबोल
19
Tarot Card: केलेल्या मेहनतीचे फळ मिळण्याचा काळ; टॅरो कार्डच्या मदतीने वाचा साप्ताहिक भविष्य!
20
Virat Kohli ने ३ नंबर 'या' फलंदाजासाठी सोडावा, स्वत: चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला यावं, Harbhajan Singh चा सल्ला

एक लावा आपलं झाड,  त्याची आपणच करायची वाढ ! अभिनेते सयाजी शिंदे

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2019 6:00 AM

आज झाडाला किंमत नाही, पैशांना किंमत

ठळक मुद्देपहिले वृक्षप्रेमी संमेलन भरविणार; राज्यभर चळवळ वाढवणार येत्या जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात संमेलन घेणार

- श्रीकिशन काळे पुणे : आपलं जगणं हे झाडांच्या ऑक्सिजनमुळे आहे. म्हणून या झाडांना जपलं, तर आपण जगू. एक आपलं झाड, त्याची आपणच करायची वाढ ही संकल्पना घेऊन लाखो झाडे लावणारे अभिनेते आणि सह्याद्री देवराईचे प्रणेते सयाजी शिंदे यांनी पहिल्यांदाच बीड येथे पहिले वृक्षप्रेमी संमेलन घेत आहेत. त्याच्या नियोजनासाठी पुण्यात नुकतीच बैठक झाली. या संमेलनाविषयी लोकमत ने त्यांच्याशी साधलेला हा संवाद... ========================================प्रश्न : पहिले वृक्षप्रेमी संमेलन बीडमध्ये घेणार आहात, त्यामागील संकल्पना काय ? - आज झाडाला किंमत नाही, पैशांना किंमत दिली जात आहे. आपण बँकेत पैसे ठेवतो. परंतु त्या पैशांपेक्षा अधिक फायदा वृक्ष आपल्याला देतात. त्यामुळे हे माझ्या ध्यानात आले आणि अगोदर स्वत: काम करायचे ठरवले. फक्त घरात बसून किंवा उपदेश करून निसर्गप्रेमी होता येत नाही, तर प्रत्यक्ष काम करायला हवे. त्यातून मग मी उजाड असलेले बीड येथील पालवन हे ठिकाण निवडले. तिथे लाखभर झाडं लावली आणि आता ते सर्वांनी पहावीत, यासाठी पहिले वृक्षप्रेमी संमेलन घ्यायचे ठरवले. येत्या जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात संमेलन घेणार आहोत.  प्रश्न : संमेलनाची रूपरेषा कशी असेल ? - बीड जिल्ह्यातील पालवन येथे मी गेल्या काही वर्षांमध्ये लाखभर झाडे लावली आहेत. तिथे पूर्वी सर्व उजाड होते. आता हिरवाई आहे. ते लोकांना दाखवायचे आहे. तिथे राँक गार्डन करत आहोत. येथे भरविण्यात येणाºया संमेलनासाठी आम्ही विद्यार्थ्यांना बोलावणार आहोत. ते येतील आणि इथला निसर्ग पाहतील. संमेलनात भाषणबाजी नसेल. निसर्ग शिक्षण देणारे स्टाँल्स असतील. प्रत्येक स्टाँलवर विद्यार्थी जाऊन निसगार्ची माहिती घेतील. वृक्षसंमेलनासारखेच वृक्ष दिंडी, वृक्ष शाळा, वृक्ष जत्रा असे उपक्रम देखील असतील. प्रश्न : सह्याद्री देवराईच्या माध्यमातून आपण काम करताय. पालवन येथील उपक्रमाला प्रतिसाद कसा आहे ? - सध्या काही लोकं स्वखचार्ने काम करत आहेत. खूप थोडी लोक सोबत आहेत. सहभाग अधिक वाढला पाहिजे, यासाठी प्रत्येक जिल्ह्यात असे संमेलन घेणार आहोत. स्थानिक नागरिक, राजकीय लोक, उद्योजक आदींनी यात सहभागी होऊन ही निसगासार्ठीची चळवळ वाढवायला हवी. प्रत्येकाने पाच झाडं लावून ती वाढवली पाहिजेत. त्या झाडांची गोष्ट इतरांना सांगितली पाहिजे. ज्याच्याकडे जास्त झाडं तो सर्वात श्रीमंत मानला पाहिजे. * वृक्ष संमेलनासोबत विविध उपक्रम घेत आहात, त्या विषयी सांगा? - झाड आपल्याला जगवतात. त्यामुळे आता प्रत्येक रूग्णालयात बाळ जन्माला आल्यानंतर त्यांना रोप दिलं पाहिजे. हे रोप देशी हवे. बोर, वड, पिंपळ, काटेसावर, कडूनिंब अशी रोपं द्यायला हवी. बाळाबरोबर त्या रोपाला वाढवलं पाहिजे. ते बाळ मोठं झाल्यावर इतरांनाही झाडाची गोष्ट सांगू शकेल. प्रत्येक शाळेत देखील विद्याथ्यार्चे एक झाड असले पाहिजे. त्या विद्याथ्यार्ने ते झाड वाढवलं पाहिजे. मग सर्व परिसर हिरवाईने नटून जाईल. शाळांनी यासाठी पुढाकार घ्यायला हवा. * वाढदिवसाला झाड लावा, या उपक्रमाची सुरवात कशी झाली ? - आई हे सर्वात मोठे विद्यापीठ आहे. मी राजा असलो, तरी तिला मरणापासून वाचवू शकत नाही. आई आपल्याला जन्म देते आणि वाढवते. पण आईनंतर आपल्याला झाडच जगवते. त्यामुळे आपण झाडांना जगवलं पाहिजे. झाडं लावली पाहिजेत. मी माझ्या आईच्या वाढदिवसाला बियांची तुला केली. तिच्या वजनाएवढ्या बिया रूजविण्याचा संकल्प केला आणि आईला सांगितले की, तू आता या झाडांच्या रूपात आयुष्यभर सोबत असशील. झाडांच्या पानांमधील आवाजातून, पक्ष्यांच्या किलबिलाटातून, फुलांच्या सुगंधातून, फळांतून तू मला भेटत राहशील. या निसर्गाच्या फुलण्यातून तुझं हसणं मला दिसेल. जिथे बी रूजेल तिथे तुझं रूप मला दिसेल. म्हणून प्रत्येकाने वाढदिवसी झाडं लावून या धरणीमातेला हिरवाईने नटवायला हवे.  ====================सध्या आमचा नारा हा 'येऊन येऊन येणार कोण, झाडाशिवाय दुसरं कोण, आमचा एकच पक्ष, तो म्हणजे वृक्ष, लिंबाच्या नावाने चांगभलं अशा घोषणा विद्यार्थ्यांच्या तोंडी आल्या की, जनजागृती व्हायला वेळ लागणार नाही. झाड आपल्याला ऊर्जा देते, आँक्सिजन देते. जगण्याचे बळ देते. त्यासाठी झाडे जगली पाहिजेत.- सयाजी शिंदे, अभिनेते आणि वृक्षप्रेमी संमेलनाचे संयोजक 

टॅग्स :Puneपुणेenvironmentपर्यावरण