शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "अजित पवार, सगळ्यांचा नाद करायचा, पण..."; भाजपा नेते राजन पाटलांच्या मुलाचं थेट चॅलेंज
2
भारताला 'हिंदू राष्ट्र' घोषित करण्याची गरज नाही, हिंदू म्हणजे अशी व्यक्ती जी...- मोहन भागवत
3
"मुलाच्या मनात माझा आदर वाढेल"; डिनर पार्टीत ट्रम्प यांनी रोनाल्डोसोबत शेअर केला घरातला खास किस्सा
4
Mumbai Airport: मुंबई विमानतळ २० नोव्हेंबर रोजी ६ तास बंद राहणार, कारण काय?
5
अनगरात 'सही'चा खेळ! अर्ज बाद होताच उज्ज्वला थिटेंचा आरोप, 'मुलगा सोबत असूनही सही राहिलीच कशी?
6
FD-RD विसरा! सुरक्षित गुंतवणूक हवी असल्यास FMP ठरेल स्मार्ट चॅाईस, लो रिस्क हाय रिटर्नचा स्मार्ट कॅाम्बो
7
भाजपाची घराणेशाही! एकाच कुटुंबातील ६ जणांना तिकीट; पत्नी, भाऊ, वहिनी, मेहुणा... सगळेच रिंगणात
8
Mahayuti: भाजप- शिंदे गटात माजी नगरसेवक फोडण्याची स्पर्धा, निवडणुकीपूर्वी महायुतीत अंतर्गत वाद शिगेला!
9
शेअर बाजारात आजही घसरण, २५,९०० च्या खाली निफ्टी; IT Stocks मध्ये मोठी खरेदी
10
Video: "लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम..."; अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा घणाघात, भाजपावर निशाणा
11
Delhi Blast: युनूस सरकारचा दावा खोटा; अटकेत असलेला इख्तियार बांगलादेशचा पर्दाफाश करणार !
12
आजचे राशीभविष्य - १९ नोव्हेंबर २०२५, जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्ती इत्यादीसाठी आजचा दिवस अनुकूल
13
Politics: "मला आणि माझा मुलाला मारण्याचा कट" भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नेत्याचा शिंदेसेनेवर गंभीर आरोप!
14
Supreme Court: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर टांगती तलवार, आरक्षणाच्या मर्यादेवर आज सुनावणी!
15
Mumbai Airport: विमानतळ परिसरातील मार्ग आजपासून २ दिवस बंद; 'या' पर्यायी मार्गाचा करा वापर!
16
CNG Supply: मुंबईकरांना मोठा दिलासा! ३ दिवसांनंतर सीएनजी पुरवठा पूर्ववत, प्रवाशांनी सोडला सुटकेचा निःश्वास
17
Farmers Relief: मुसळधार पाऊस किंवा वन्य प्राण्यांनी पीक तुडवले, नुकसान भरपाई मिळणार,  पण एक अट!
18
Mahayuti: एकमेकांचे माजी नगरसेवक, पदाधिकारी पळवण्यावरून महायुतीत घमासान! 
19
Government Decision: 'नोटरी'वर झालेले जमीन व्यवहारही आता कायदेशीर; ३ कोटी नागरिकांना मोठा दिलासा
20
एकाचवेळा तीन बिबट्यांच्या घराला घिरट्या; शिकारीच्या शोधात आलेले सीसीटीव्ही कॅमेरात कैद 
Daily Top 2Weekly Top 5

Railway: रेल्वे स्थानकांवर आता खा पिझ्झा, बर्गर आणि फ्रेंच फ्राईज; १७ ठिकाणी डेक सुविधा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 07:57 IST

उपनगरी स्टेशनवर आता पिझ्झा, बर्गर, फ्रेंच फ्राईस हे खाद्यपदार्थ मिळणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : उपनगरी स्टेशनवर आता पिझ्झा, बर्गर, फ्रेंच फ्राईस हे खाद्यपदार्थ मिळणार आहेत. यासाठी रेल्वे बोर्डाने रेल्वे स्टेशनवर ‘प्रीमियम ब्रँड केटरिंग आउटलेट्स’ ही स्टॉल्सची एक नवीन श्रेणी मंजूर केली. ज्यामुळे आता प्रचलित खाद्यपदार्थांच्या कंपन्यांना त्यांचे कॅफे सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

रेल्वे स्टेशनवर सध्या ३ प्रकारचे खाद्यपदार्थांचे स्टॉल्स सुरू करण्यास परवानगी आहे. यामध्ये चहा, बिस्किट, नाश्ता स्टॉल्स, दुग्धजन्य पदार्थ आणि ताज्या फळांचे रस विकण्याचे काउंटर यांचा समावेश आहे. या ठिकाणी रेल्वेने ठरवून दिलेल्या प्रमाणात आणि किमतीमध्ये खाद्य पदार्थ विकण्यास परवानगी आहे. आता नव्याने समाविष्ट केलेल्या श्रेणीमध्ये कंपनीला त्यांच्या किमतीत आणि ते ठरवतील त्या प्रमाणामध्ये खाद्यपदार्थांची विक्री करण्यास परवानगी असणार आहे.  

रेल्वे प्लॅटफॉर्मवर असलेल्या ९० चौरस फुटांच्या स्टॉल्सचे वार्षिक परवाना शुल्क ४ ते ५ लाख रुपये असते. परंतु, प्रीमियम केटरिंग स्टॉल्ससाठी जास्त जागा देण्यात येणार आहेत. रेल्वे अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ‘प्रीमियम ब्रँड केटरिंग आउटलेट’चे वाटप ई-लिलाव धोरणानुसार केले जाईल. 

१७ स्टेशनवर  डेक सुविधा मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या १७ रेल्वे स्टेशनवर मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनच्या माध्यमातून डेक उभारले जात आहेत. या माध्यमातून रेल्वेला सुमारे ६.४३ लाख चौरस फूट किंवा १४७ एकरपेक्षा जास्त जागा उपलब्ध होणार आहे. प्रवाशांच्या सुविधेसाठी हे डेक उभारले जात असून, या जागेचा व्यावसायिक वापरही करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.  

English
हिंदी सारांश
Web Title : Pizza, Burgers, Fries Now Available at Railway Stations; Deck Facilities at 17 Locations

Web Summary : Railway stations will now offer pizza, burgers, and fries with new premium catering outlets approved. These outlets will be allowed to set their own prices. Seventeen stations will get deck facilities for commercial use and passenger convenience, adding space for vendors.
टॅग्स :railwayरेल्वेMumbaiमुंबईMaharashtraमहाराष्ट्र