शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरीमध्ये दहावीच्या मुलाने मुलावरच केला लैंगिक अत्याचार, दापोडीतला धक्कादायक प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2017 14:05 IST

दहावीतील 16 वर्षीय मुलानेच 11 वर्षीय मुलावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना दापोडी येथे उघडकीस आली आहे.

पिंपरी :  दापोडी येथील अनाथ आश्रमात दहावीत शिकणा-या विद्यार्थ्याने ११ वर्षाच्या मुलावर लैगिंक अत्याचार केल्याची घटना गुरूवारी सकाळी ११ च्या सुमारास उघडकीस आली. भोसरी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल  केला आहे. तीन महिन्यांपासून हा प्रकार सुरू असताना,या प्रकरणी आश्रमाच्या संचालकांनी पोलिसांकडे धाव घेतली नाही. या बद्दल पोलिसांकडून संचालकाची कसून चौकशी सुरू आहे. 

दापोडीतील झोपडपट्टी परिसरात सरस्वती आश्रम आहे. लक्ष्मण देवीदास सुरवसे हे आश्रमाचे संचालक आहेत.  पुणे आणि पिंपरी चिंचवड शहर परिसरातील झोपडपट्टीतील मुले  या आश्रमात ठेवण्यात आली आहेत. गरिब,गरजू कुटूंबातील ५० मुले या आश्रमात आहेत, एका ११ वर्षाच्या मुलावर दहावीतील मुलाने लैगिंक अत्याचार केल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला. पिडीत मुलाने त्याच्यावर झालेल्या अत्याचाराची माहिती आईला दिली. आईने पोलिसांत जाऊन तक्रार देण्याचा निर्णय घेतला. मात्र आरोपी मुलाच्या नातेवाईकांनी पिडीत मुलाच्या आईला तक्रार देण्यापासून रोखले. तक्रार देऊ नये, म्हणुन त्यांना ८ हजार रूपये दिले. तसेच संस्थेकडून कोणी पोलिसांकडे जाऊ नये,यासाठी संस्थाचालक सुरवसे यांना पाच हजार रूपये दिले. अशी चर्चा आहे. तक्रार देण्यास अडचणी येऊ लागल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मुलावर अत्याचार झाले, मात्र त्याची तक्रार दाखल होत नसल्याची बाब पोलिसांच्या लक्षात येताच, पोलिसांनी या प्रकरणात लक्ष घातले. आश्रमास भेट देऊन घडलेल्या घटनेची माहिती घेतली. पिडित आणि अत्याचार करणारा मुलगाही अल्पवयीन आहे. पुढील कायदेशीर कार्यवाहीची प्रक्रिया भोसरी पालिसांनी सुरू केली.  

टॅग्स :Rapeबलात्कारMolestationविनयभंगCrimeगुन्हाPuneपुणे