पिंपरी-चिंचवडमध्ये संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे स्वागत !
By Admin | Updated: June 28, 2016 17:44 IST2016-06-28T17:44:54+5:302016-06-28T17:44:54+5:30
टाळ-मृदंगाचा गजर करीत, भगव्या पताका नाचवत... विणेच्या अखंड झंकारात, ह्यज्ञानोबा-तुकारामह्णचा जयघोष करीत प्रस्थान पंढरपूरकडे केलेल्या संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखीचे

पिंपरी-चिंचवडमध्ये संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे स्वागत !
ऑनलाइन लोकमत
पुणे,दि. २८ - टाळ-मृदंगाचा गजर करीत, भगव्या पताका नाचवत... विणेच्या अखंड झंकारात, ह्यज्ञानोबा-तुकारामह्णचा जयघोष करीत प्रस्थान पंढरपूरकडे केलेल्या संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखीचे पिंपरीत मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले.
तुकाराम महाराजांच्या पालखीचे पिंपरी चिंचवड उदयोग नगरीत सायंकाळी पाचला आगमन झाले. यावेळी महापौर शकुंतला धराडे, खासदार श्रीरंग बारणे उपस्थित होते.
पिंपरीतील भक्ती शक्ती चौकात भक्तांचा अपूर्व उत्साह दिसून येत आहे. तसेच, या ठिकाणी ढगाळ वातावरणाचे चित्र दिसून येत आहे. दरम्यान, या ठिकाणी पोलिस मित्र सेवाभावी संस्थेतर्फे वारक-यांनी सेवा करण्यात येत आहे.