शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

"विमान हवेत अन् पायलटच्या सीटवर मालक झोपला"; जय पवारांनी शेअर केला धक्कादायक व्हिडीओ, अटकेची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2026 00:16 IST

जय पवार यांनी व्हीएसआरवर कारवाईची मागणी करत धक्कादायक व्हिडीओ समोर आणला आहे.

Jai Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाला महिना उलटत नाही तोच, त्यांचे पुत्र जय पवार यांनी या अपघातासंदर्भात अत्यंत धक्कादायक खुलासा केला आहे. ज्या VSR कंपनीच्या विमानात अजित पवारांचा अंत झाला, त्या कंपनीचा मालक रोहित सिंह हे उड्डाणादरम्यान पायलटच्या सीटवर झोपलेले असल्याचा एक व्हिडिओ जय पवार यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. अशा प्रकारचा गंभीर निष्काळजीपणा करणाऱ्या कंपनीवर आणि त्यांच्या मालकावर कारवाई करण्याची मागणी जय पवार यांनी केली आहे.

जय पवारांची  DGCA कडे मागणी

जय पवार यांनी अत्यंत भावूक पोस्ट लिहिली आहे. जय पवार यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये, व्हीएसआर कंपनीचे मालक रोहित सिंह हे मुख्य पायलटच्या सीटवर बसलेले असून उड्डाण सुरू असताना ते चक्क झोपलेले दिसत आहेत.

"माझ्या वडिलांना आपण गमावले ही वेदना आयुष्यभर साथ देणार आहे. या व्हिडिओमध्ये व्हीएसआरचे मालक रोहित सिंह मुख्य पायलटच्या सीटवर उड्डाणादरम्यान झोपलेले दिसत आहेत. आकाशात असताना असा निष्काळजीपणा असू शकत नाही. हे अत्यंत गंभीर आणि धक्कादायक आहे. मी डीजीसीएकडे ठामपणे मागणी करतो की, या प्रकरणात तात्काळ कठोर कारवाई व्हावी. संपूर्ण चौकशी होईपर्यंत व्हीएसआरची सर्व विमाने तात्काळ ग्राउंड करण्यात यावीत आणि रोहित सिंह यांना त्वरित अटक करून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. ही एका मुलाची आर्त हाक आहे… माझ्या वडिलांसाठी आणि प्रत्येक प्रवाशाच्या सुरक्षिततेसाठी," असं जय पवार यांनी पोस्टमध्ये म्हटलं.

रोहित पवारांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा

आमदार रोहित पवार यांनी या दुर्घटनेनंतर पहिल्या दिवसापासून आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यांनी सातत्याने या कंपनीच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी लावून धरली होती. जय पवारांच्या ताज्या आरोपांनंतर रोहित पवारांच्या भूमिकेला अधिक बळ मिळाले आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Pilot Sleeps on Duty: Pawar Demands Arrest After Shocking Video

Web Summary : Jai Pawar shared a video of VSR company owner Rohit Singh sleeping in the pilot's seat during flight. He demands immediate arrest and grounding of all VSR planes, urging DGCA for strict action after his father's death in a VSR plane crash.
टॅग्स :Ajit Pawarअजित पवारPlane Crashविमान दुर्घटनाAccidentअपघातRohit Pawarरोहित पवार