शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
6
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
7
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
8
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
9
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
10
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
11
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
12
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
13
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
14
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
15
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
16
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
17
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
18
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
19
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
20
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव

फडणवीस पुन्हा आले, विधिमंडळाच्या कॅलेंडरवर मुख्यमंत्री झाले

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2020 5:17 PM

विधिमंडळाच्या कॅलेंडरवर मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांचा फोटो

मुंबई: माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 'मी पुन्हा येईन' ही घोषणा राज्यात गाजली होती. विधानसभेत बोलताना 'मी पुन्हा येईन' ही कविता सादर करत फडणवीसांनी पुन्हा एकदा आपणच मुख्यमंत्री होऊ असा विश्वास व्यक्त केला होता. मात्र शिवसेनेनं काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन केल्यानं देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत्री होता आलं नाही. मात्र असं असलं तरी विधिमंडळाच्या कॅलेंडरवर देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असल्याचं दिसत आहे. विधिमंडळाच्या कॅलेंडरवर मुख्यमंत्री म्हणून फडणवीस यांचा फोटो छापण्यात आल्यानं सध्या हे कॅलेंडर राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.राज्यात सध्या उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वाखालील महाविकास आघाडीचं सरकार आहे. २८ नोव्हेंबर २०१९ रोजी त्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर जानेवारीत त्यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. मात्र विधिमंडळाच्या कॅलेंडरवर मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचाच फोटो आहे. याशिवाय राज्यपाल म्हणून सी. विद्यासागर राव यांचा फोटो छापण्यात आला आहे. त्यामुळे हे कॅलेंडर नेमकं छापलं कधी आणि इतकी गंभीर चूक केली कोणी, असे प्रश्न उपस्थित झाले आहेत. 

विधिमंडळाच्या कॅलेंडरवर देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच राधाकृष्ण विखे पाटील यांचादेखील फोटो आहे. त्यांच्या फोटोखाली विरोधी पक्षनेते, विधानसभा असं पद छापण्यात आलं आहे. याशिवाय धनंजय मुंडे (विरोधी पक्षनेते, विधान परिषद), रामराजे निंबाळकर (सभापती, विधान परिषद), हरिभाऊ बागडे (विधानसभा अध्यक्ष) यांचे फोटो आहेत. त्यामुळे हे कॅलेंडर आधीच छापण्यात आलं होतं का की सत्ताबदल होऊनदेखील त्यात सुधारणा करण्यात आल्या नाहीत, असे प्रश्न निर्माण झाले आहेत. या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असं जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी सांगितलं. राज्यात आपलंच सरकार येईल, असं काहींना वाटत होतं. त्यातूनच हे कॅलेंडर छापण्यात आलं असावं, असं पाटील म्हणाले. ज्या अधिकाऱ्याकडून चूक झाली, त्याच्यावर कारवाई करण्यात येईल आणि कॅलेंडर छपाईचा खर्चदेखील त्याच्याकडून घेण्यात येईल, असंदेखील पाटील यांनी स्पष्ट केलं. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरेDhananjay Mundeधनंजय मुंडेRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटील