मुंबई: माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 'मी पुन्हा येईन' ही घोषणा राज्यात गाजली होती. विधानसभेत बोलताना 'मी पुन्हा येईन' ही कविता सादर करत फडणवीसांनी पुन्हा एकदा आपणच मुख्यमंत्री होऊ असा विश्वास व्यक्त केला होता. मात्र शिवसेनेनं काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन केल्यानं देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत्री होता आलं नाही. मात्र असं असलं तरी विधिमंडळाच्या कॅलेंडरवर देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असल्याचं दिसत आहे. विधिमंडळाच्या कॅलेंडरवर मुख्यमंत्री म्हणून फडणवीस यांचा फोटो छापण्यात आल्यानं सध्या हे कॅलेंडर राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.राज्यात सध्या उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वाखालील महाविकास आघाडीचं सरकार आहे. २८ नोव्हेंबर २०१९ रोजी त्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर जानेवारीत त्यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. मात्र विधिमंडळाच्या कॅलेंडरवर मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचाच फोटो आहे. याशिवाय राज्यपाल म्हणून सी. विद्यासागर राव यांचा फोटो छापण्यात आला आहे. त्यामुळे हे कॅलेंडर नेमकं छापलं कधी आणि इतकी गंभीर चूक केली कोणी, असे प्रश्न उपस्थित झाले आहेत.
फडणवीस पुन्हा आले, विधिमंडळाच्या कॅलेंडरवर मुख्यमंत्री झाले
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2020 17:26 IST