फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयातील सेवा देत असलेली महिला डॉक्टरने एका नामांकीत हॉटेलमध्ये आत्महत्या केल्याने सातारा पोलिस आणि आरोग्य खात्यासह राजकारण्यांवर आरोप होऊ लागले आहेत. तिने तळहातावर लिहिलेल्या चिठ्ठीत नाव असलेल्या प्रशांत बनकर याला त्याच्या मित्राच्या फार्महाऊसवरून अटक करण्यात आली आहे. तर बलात्काराचा आरोप असलेला पीएसआय गोपाल बदने हा अद्याप फरार आहे.
Satara Crime: महिला डॉक्टरने थेट सातारच्या डीएसपींनाही फोन केलेला...; आतेभावाच्या आरोपाने खळबळ
गोपाल बदने हा मुळचा परळीचा असून त्याचे शेवटचे लोकेशन हे पंढरपूर असल्याचे समोर आले आहे. यानंतर तो कुठे गेला याची कोणालाच माहिती नाही. पोलिसांची दोन पथके त्याच्या मागावर निघाली असून लवकरच तो ताब्यात येईल, अशी अपेक्षा बाळगली जात आहे. तर दुसरीकडे प्रशांत बनकरला आज पहाटे अटक करण्यात आली आहे.
बनकरच्या आई वडिलांनी आपल्या मुलाचे नाव यात गोवण्यात आल्याचा आरोप केला आहे. आमचा मुलगा पुण्याला असतो. तो दिवाळीसाठी घरी आलेला होता. आमचा मुलगा असा नाही. त्या मॅडमनी अन्याय करून गेल्या आहेत. तिने मुद्दाम नाव लिहिले, असे बनकरच्या आईने म्हटले आहे. तर मी तिला मुलीप्रमाणे सांभाळले. तिच्याकडून ही अपेक्षा नव्हती. तिने कोणाच्या दबावाखाली हे केले आहे का, हे शासनाने पहावे, असे वडील म्हणाले आहेत. टीव्ही नाईन या वृत्तवाहिनीला त्यांनी हे सांगितले आहे.
Web Summary : A doctor's suicide in Satara implicates PSI Badne and Prashant Bankar. Badne is absconding; Bankar arrested. Bankar's parents allege their son's innocence, claiming the doctor unfairly implicated him, possibly under duress.
Web Summary : सतारा में एक डॉक्टर की आत्महत्या में पीएसआई बदने और प्रशांत बनकर शामिल। बदने फरार; बनकर गिरफ्तार। बनकर के माता-पिता ने अपने बेटे को निर्दोष बताया, और आरोप लगाया कि डॉक्टर ने अनुचित तरीके से उसे फंसाया, संभवतः दबाव में।