शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
2
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
3
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
5
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
6
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
7
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
8
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
9
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
10
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
11
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
12
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
13
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
14
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
15
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
16
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
17
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
18
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
19
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
20
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष

Petrol-Diesel prices:नऊ रुपये स्वस्त पेट्रोलसाठी गाड्या थेट गुजरातच्या पंपावर   

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2022 06:08 IST

Petrol-Diesel prices Hike: महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्याच्या तुलनेत गुजरात आणि सिल्वासा या केंद्रशासित प्रदेशात इंधनाचे दर तुलनेने कमी आहेत. त्यामुळे स्थानिक वाहनचालक इंधन भरण्यासाठी सीमेपलीकडील पंपांवर रांगा लावताना दिसत आहेत.

बोर्डी : इंधनाचे भाव गगनाला भिडल्याने पेट्रोल, डिझेल आणि सीएनजी इंधन भरणे खिशाला न परवडणारे झाले आहे. महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्याच्या तुलनेत गुजरात आणि सिल्वासा या केंद्रशासित प्रदेशात इंधनाचे दर तुलनेने कमी आहेत. त्यामुळे स्थानिक वाहनचालक इंधन भरण्यासाठी सीमेपलीकडील पंपांवर रांगा लावताना दिसत आहेत. दरम्यान, तेथेही गर्दी वाढून तास-तासभर थांबावे लागत असल्याने आगीतून फोफाट्यात पडल्याची भावना स्थानिक वाहनचालकांची झाली आहे.

मागील जून महिन्यांपासून पेट्रोलचे दर शंभरी पार जाण्यास प्रारंभ झाला. काही महिने हे दर स्थिर राहिल्यानंतर एप्रिल महिन्यात प्रतिलिटर उच्चांकी दरवाढ सुरू आहे. त्यामुळे वाहनांमध्ये पेट्रोल भरणे नागरिकांना जिकिरीचे झाले आहे. गुजरात येथे पेट्रोलचे प्रतिलिटर दर १०६.३५ पैसे, तर सीएनजी प्रतिकिलो ७६.९८ आहे. पालघरच्या तुलनेत सुमारे ९ रुपयांनी हे दर कमी आहेत. त्यामुळे वाहनचालक पेट्रोल भरण्यासाठी सीमेपलीकडे जाण्यास पसंती देत आहेत. नागरिक वाहनात पेट्रोल भरण्यासह कॅन किंवा प्लास्टिक बाटलीत भरून सोबत नेत आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या तुलनेत पैशांची बचत होत आहे.

रोजगारावर होत आहे परिणाम असे असले तरी इंधन भरण्यासाठी उंबरगाव, संजाण येथे रांगा लागत असल्याने तासनतास वाया जातो. तर दैनंदिन रोजगारावर परिणाम होत असल्याची खंत रिक्षांसह अन्य वाहनचालकांनी बोलून दाखवली.   पंपांवर गर्दी वाढल्याने अतिरिक्त ताण वाढून वाहनांच्या व्यवस्थापनावर अधिक लक्ष द्यावे लागत असल्याचे तेथील पंपचालकांचे म्हणणे आहे.   लसीकरणावेळी महाराष्ट्रापेक्षा गुजरातेत अधिक सेंटर असल्याने पूर्वी येथील नागरिकांच्या रांगा त्या राज्यात दिसल्या होत्या. या आठवणींना उजाळा मिळाला आहे.

टॅग्स :Petrol Pumpपेट्रोल पंपMaharashtraमहाराष्ट्रGujaratगुजरात