शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
3
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
4
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
5
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
6
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
8
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
9
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
10
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
11
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
12
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
13
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
14
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
15
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
16
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
17
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
18
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
19
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
20
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

आझाद मैदानावर पॅनकार्डक्लब कंपनीच्या गुंतवणूकदारांचा आक्रोश

By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2018 4:02 PM

राष्ट्रशक्ती या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून राज्यातील तसेच कर्नाटक व गोवा येथील गुंतवणूकदारांचे मोठे संघटन उभे राहिले आहे.

मुंबई : राज्यभरातच नव्हे तर देशभरात गाजत असलेल्या पॅनकार्ड कंपनीच्या गुंतवणूकदारांचा प्रश्न अधिकच संवेदनशील होत चाललेला असताना, राज्य किंवा केंद्र सरकार ठोस कारवाई करायला अद्यापही तयार नसल्याने, आज मुंबईच्या आझाद मैदानावर पॅनकार्ड कंपनीच्या हजारो बाधित गुंतवणूकदारांनी सरकारविरुद्ध टाहो फोडला. 

राष्ट्रशक्ती या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून राज्यातील तसेच कर्नाटक व गोवा येथील गुंतवणूकदारांचे मोठे संघटन उभे राहिले आहे. सुमारे २ वर्षे सातत्याने आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला, मात्र हे सरकार ऐकायला तयार नाही. सरकारच्या संवेदना मेल्या आहेत का..? हे सरकार मृत झाले आहे का..? असा प्रश्न उपस्थित करीत पॅनकार्ड कंपनीच्या हजारो बाधित गुंतवणूकदारांनी आज मुंबईच्या आझाद मैदानावर, केंद्र व राज्य सरकारचा निषेध नोंदवत सर्वपित्रीला सरकारचे श्राद्ध घातले.

 राष्ट्रशक्ती संघटनेच्या आवाहनाला प्रतिसाद देत, राज्यभरातून हजारो गुंतवणूकदार आज आझाद मैदानावर जमले होते. यावेळी आंदोलनाला राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने राज्याचे  प्रवक्ते नवाब मलिक यांनी उपस्थित राहून पाठींबा दिला व मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना ते म्हणाले कि, “ज्या पद्धतीने कर्ज बुडवून पळून गेलेल्या  मोठ्या उद्योगपतींना, कर्ज दिलेल्या बँकांना शासनाने पतपुरवठा केला आणि पैसे दिले, त्याच धर्तीवर या बंद झालेल्या कंपनीच्या मिळकती सरकारने जप्त करून या छोट्या गुंतवणूकदारांचा परतावा शासनाने परत दिला पाहिजे, तसेच राष्ट्रशक्ती संघटनेच्या वतीने जो लढा उभा करण्यात आला आहे या लढ्यात सक्रीय सहभाग घेऊन गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळेपर्यंत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष पूर्णपणे संघटनेच्या पाठीशी राहील, असे आश्वासन त्यांनी या वेळी दिले.

 या आंदोलानाची सुरुवात सरकारला श्रद्धांजली अर्पण करून झाली. संघटनेच्या सर्वच वक्त्यांनी सरकारचा समाचार घेत निषेध नोंदवला. “कंपनीच्या मिळकतींच्या लिलावास ग्राहक मिळत नाही, अशी सबब सांगून सेबीने अनेक मिळकतींचे भाव ६० ते७० टक्क्याने कमी केले आहेत. यामुळे गुंतवणूकदारांना परतावा मिळणे कठीण होणार आहे. राज्यातील ३५ लाख सामान्य गुंतवणूकदार या प्रकरणी बाधित झाले असताना सरकार या विषयावर संवेदनशील नाही. शेतकऱ्यांप्रमाणे गुंतवणूकदारांनीही आत्महत्या करायची सरकार वाट पाहत आहे का..? असा प्रश्न विचारात “राज्यातील ३५ लाख गुंतवणूकदार येणाऱ्या निवडणुकीत सरकारला खाली खेचतील” असा इशारा राष्ट्रशक्ती संघटनेने आझाद मैदानावर दिला. तर इन्व्हेस्टर्स वेल्फेअर फोरमने  “दि.२४ ऑक्टोबर च्या लिलावात सेबीला ग्राहक मिळाला नाही तर राज्य व केंद्र सरकारने कंपनीच्या मिळकती ताब्यात घेऊन गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत द्यावेत” अशी आग्रही मागणी केली.

मंत्रालयाच्या प्रतिमेचे श्राद्ध घातलेयावेळी व्यासपीठावर मंत्रालयाच्या प्रतिमेला हार घालून त्यासमोर पिंड ठेऊन श्राद्ध घालण्यात आले. “मुर्दाड सरकार हाय हाय, गुंतवणूकदारांना परतावा मिळालाच पाहिजे, अशा घोषणांनी आझाद मैदान गुंतवणूकदारांनी दणाणून सोडले. या वेळी राष्ट्रशक्तीचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी गेले असता मुख्यमंत्री यांचे वतीने महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ते स्वीकारले व याप्रकरणी योग्य ती कार्यवाही करण्यासाठी पाठपुरावा करू, असे आश्वासन दिले. यावेळी राज्यातील पुणे, मुंबई, अमरावती, नागपूर, अकोला, धुळे, नगर, शिरूर,जळगाव, भुसावळ, बेळगाव, सातारा, सांगली, कोल्हापूर, गडहिंग्लज, सिंधुदुर्ग, नाशिक, या परिसरातून मोठ्या प्रमाणावर गुंतवणूकदार आले होते. तर गोवा कर्नाटक राज्यातूनही गुंतवणूकदारांनी आंदोलनाला हजेरी लावली होती.

टॅग्स :State Governmentराज्य सरकारMaharashtraमहाराष्ट्रInvestmentगुंतवणूक