शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
2
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
3
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
4
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
5
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
6
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
7
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
8
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
9
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
10
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
11
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
12
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
13
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
14
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
15
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
16
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
17
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
18
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
19
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
20
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन

Sanjay Raut : काल रस्त्यावर उतरलेली गर्दी हीच खरी शिवसेना- संजय राऊत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2022 10:53 IST

People supporting CM Uddhav Thackeray on Roads of Maharashtra is real Shivsena not the Eknath Shinde Group says Sanjay Raut : उद्धव ठाकरेंनी वर्षा निवासस्थान सोडल्यानंतर रस्त्यावर कार्यकर्त्यांची झाली होती गर्दी

Sanjay Raut vs Eknath Shinde Real Shivsena: ईडीच्या भीतीने किंवा अन्य काही आमिषांना बळी पडून काही आमदार पळाले असतील तर ते योग्य नाही. जे स्वत:ला बछडे, वाघ म्हणून घेत होते, ते म्हणजे पक्ष नाही. काल जो रस्त्यावर पाहिला तो खरा शिवसेना पक्ष आहे. उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांच्या नेतृत्वाखाली पक्ष अद्यापही मजबूत आहे. काही आमदार, खासदार, नगरसेवक गेले याचा अर्थ पक्ष गेला असं होत नाही, अशा शब्दांत शिवसेना खासदार यांनी प्रतिक्रिया दिली. "गेलेले आमदार का गेलेत त्याची कारणं लवकरच समोर येतील. काही लोक आमच्या संपर्कात आहेत. काही आमदारांनी आम्हाला सांगितलं की त्यांच्यावर दबाव आहे. शिवसेनेचे १७-१८ भाजपाच्या ताब्यात आहेत. त्यांच्या मदतीशिवाय अशाप्रकारे भाजपाशासित राज्यात आमदारांना डांबून ठेवणं शक्य नाही", असा आरोपही संजय राऊत Sanjay Raut यांनी केला.

"आमचा शिवसेना पक्ष ही आमची संपत्ती आहे. उद्धव ठाकरे वर्षा वरून मातोश्री वर जाताना रस्त्यावर उतरली ती खरी शिवसेना. आमच्या संपर्कात शिवसेनेचे २० आमदार आहेत. त्यांना परत यायचंय असं ते म्हणत आहेत. ज्या प्रकारचे संकट आता आमच्यावर आले आहे त्या संकटाचा सामना करण्याचा पूर्ण अनुभव शिवसेनेला आहे. बाळासाहेबांसोबत आम्ही काम केले आहे. आम्ही बाळासाहेबांचे भक्त आहोत असं म्हणून ते भक्त होत नाही. बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक पळून जात नाहीत", असा खोचक टोला त्यांना लगावला.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांची साथ सोडून जाणाऱ्या आमदारांची संख्या वाढत असताना दुसरीकडे एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देणाऱ्या आमदारांच्या संख्येत वाढ झाली आहे. एकनाथ शिंदे त्यांच्या समर्थक आमदारांसह गुवाहाटीच्या हॉटेल रॅडिसन ब्लूमध्ये मुक्कामाला आहेत. काल (२२ जून) एकनाथ शिंदे यांच्या गटात गुलाबराव पाटील, योगेश कदम, चंद्रकात पाटील आणि मंजुळा गावित हे सामील झाले. मंत्री गुलाबराव पाटलांनंतर शिवसेनेला आज सकाळी आणखी एक धक्का बसला. कोकणातील सेनेचे नेते दीपक केसरकर गुवाहाटीत एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस एकनाथ शिंदे यांची ताकद आणखी वाढत असल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना