शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

वैभव राऊतसह अटकेतील इतर आरोपी सनातनचे साधक नाहीत, सनातन संस्थेचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2018 14:30 IST

नालासोपारा येथील बॉम्बस्फोटप्रकरणी अटक करण्यात आलेल्या वैभव राऊतसह इतर आरोपी हे सनातन संस्थेचे साधक नसल्याचा दावा सनातन संस्थेने केला आहे.

मुंबई - नालासोपारा येथील बॉम्बस्फोटप्रकरणी अटक करण्यात आलेल्या वैभव राऊतसह इतर आरोपी हे सनातन संस्थेचे साधक नसल्याचा दावा सनातन संस्थेने केला आहे. सनातनचे प्रवक्ते चेतन राजहंस यांनी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत हा दावा करून अटक आरोपींबाबत आपले हात झटकले आहेत. तसेच मराठा आंदोलन आणि ईदमध्ये बॉम्बस्फोट करण्याचा सनातनचा होतू होता, असा करण्यात येत असलेला आरोपही सनातनने फेटाळला आहे. नालासोपारा येथे आढळलेली स्फोटके, त्यानंतर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येमध्ये हात असलेल्या आरोपींना अटक करण्यात आलेल्या अटकेनंतर या आरोपींचा सनातनशी संबंध असल्याचा दावा करण्यात आला होता. तसेच सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणी विविध संघटनांकडून करण्यात येत होती. त्या पार्श्वभूमीवर सनातन संस्थेने आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. वैभव राऊतसह अटक करण्यात आलेल्या इतर आरोपींचा सनातनशी संबंध नाही. ते सनातनचे साधक नव्हते, असा दावा यावेळी सनातनचे प्रवक्ते चेतन राजहंस यांनी केला. "तपासात सनातनचे थेटपणे नाव आलेले नाही. मराठा आंदोलन तसेच ईददरम्यान स्फोट घडवण्याचा सनातनचा हेतू होता, असा करण्यात आलेला आरोप धादांत खोटा आहे. असे राजहंस यांनी सांगितले.  सनातनबाबत प्रसारमाध्यमांमध्ये खोट्या बातम्या येत असून, अशा बातम्या प्रसारित करणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा सनातनकडून देण्यात आला आहे. या प्रकरणामध्ये सनातनला विनाकारण गोवण्यात येत असून, अंनिसकडून आम्हाला बदनाम करण्यात येत असल्याचा आरोपही सनातनच्या प्रवक्त्यांनी केला.  

टॅग्स :Sanatan Sansthaसनातन संस्थाnewsबातम्याMaharashtraमहाराष्ट्रMumbaiमुंबई