शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

प्रलंबित सेवा अपिले आणखी रेंगाळणार

By admin | Updated: June 14, 2015 02:50 IST

राज्याच्या पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सेवा प्रकरणांमधील १५० ते २०० अपिलांवर आधीच्या सरकारमधील गृह राज्यमंत्री सतेज पाटील

अजित गोगटे, मुंबईराज्याच्या पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सेवा प्रकरणांमधील १५० ते २०० अपिलांवर आधीच्या सरकारमधील गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी घेतलेल्या निकालांचा नव्या सरकारमधील दोन्ही गृह राज्यमंत्री फेरआढावा घेणार असून, यामुळे गेल्या एक वर्षाहून अधिक काळ प्रलंबित असलेली अपिले रेंगाळण्याची चिन्हे आहेत.गेल्या महिनाअखेरीस सेवानिवृत्त झालेले पुण्यातील एक पोलीस निरीक्षक राहुलकुमार बाबासाहेब येवले यांनी दाखल केलेल्या प्रकरणात केलेल्या प्रतिज्ञापत्रात गृह विभागातील एक उपसचिव प्रकाश देशमुख यांनी ही माहिती महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणास (मॅट) दिली आहे. यात नेमका आकडा दिलेला नसला तरी किमान १५०-२०० अपिलांचा नवे गृह राज्यमंत्री फेरआढावा घेणार असल्याचे कळते. निलंबनाच्या विरोधात केलेल्या अपिलावर तत्कालीन गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांच्याकडे गेल्या वर्षी १९ आॅगस्ट रोजी सुनावणी होऊनही त्याचा निकाल अद्याप कळविला न गेल्याने येवले यांनी अ‍ॅड. अरविंद बांदिवडेकर यांच्यामार्फत ‘मॅट’कडे याचिका केली होती. अशा प्रकारे अपिलावर एकदा दिलेल्या निकालाचा सरकारला फेरआढावा घेता येतो की नाही, यावर भाष्य न करता ‘मॅट’चे न्यायिक सदस्य आर. बी. मलिक यांनी म्हटले की, फेरआढावा घ्यायचा झाला तरी आधी झालेला निकाल अपिलकर्त्यास कळविणे गरजेचे आहे. त्यामुळे आधीच्या राज्यमंत्र्यांनी घेतलेला निकाल येवले यांना दोन आठवड्यांत कळविण्यात यावा, असे निर्देश न्यायाधिकरणाने दिले.आधीच्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सरकारमध्ये सतेज पाटील हे एकच गृह राज्यमंत्री होते. त्यांनी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सेवा प्रकरणांतील अपिलांवर सुनावणी घेऊन आपला निर्णय फाइलमध्ये लिहिलाही होता. परंतु गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने राज्यमंत्र्यांनी दिलेल्या निर्णयानुसार औपचारिक निकालपत्रे तयार करून, ती संबंधित अपिलकर्त्यांना पाठविण्याचे काम थांबले.निवडणुकीनंतर युतीचे सरकार सत्तेवर आले व नव्या सरकारमध्ये डॉ. रणजित पाटील व राम शिंदे असे दोन गृह राज्यमंत्री झाले. पाटील यांच्याकडे शहरी भाग व शिंदे यांच्याकडे ग्रामीण भाग असे कामाचे वाटप झाले. पाटील यांनी आधीच्या राज्यमंत्र्यांनी दिलेल्या निकालांचा फेरआढावा घेता येईल का, याविषयी विधी व न्याय विभागाचे मत घेण्यास सांगितले. फेरआढावा घेता येईल, असे मत विधी व न्याय विभागाने २१ मे रोजी दिल्यानंतर आता दोन्ही गृह राज्यमंत्री आपापल्या कार्यक्षेत्राशी संबंधित प्रकरणांमध्ये आधीच्या राज्यमंत्र्यांनी दिलेल्या निकालांचा फेरआढावा घेतील, असे देशमुख यांच्या प्रतिज्ञापत्रात नमूद केले गेले आहे. (विशेष प्रतिनिधी) विधी विभागाचे घूमजाव!देशमुख यांच्या प्रतिज्ञापत्रास विधी व न्याय विभागातर्फे अवर सचिव रजनीकांत जाधव यांनी दिलेल्या मताची प्रतही जोडली आहे. त्यावरून आधीच्या राज्यमंत्र्यांनी दिलेल्या निकालांचा नवे राज्यमंत्री स्वत:हून फेरआढावा घेऊ शकतात की नाही, याबाबत विधी विभागाने एक महिन्यात घूमजाव केल्याचे स्पष्ट होते. अपिलाच्या सुनावणीच्या वेळी उपलब्ध नसलेली अथवा सादर करता येऊ न शकलेली नवी माहिती वा पुरावा समोर आला, तरच आधी दिलेल्या निकालाचा फेरआढावा घेता येईल अन्यथा नाही, असे मत विधी विभागाने २० एप्रिल रोजी दिले होते. यानंतर महिनाभराने सर्वोच्च न्यायालयाच्या अनेक निकालांचे दाखले देत विधी विभागाने याच्या नेमके उलटे मत दिले. ताज्या मतानुसार विधी विभागाचे असे मत आहे, की जोपर्यंत निकाल संबंधितास कळविला जात नाही तोपर्यंत तो ‘निकाल’ होत नाही. ते फक्त संबंधित प्राधिकाऱ्याने नोंदविलेले मत असते.