अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचारी ठार, बोरगाव मंजू नजीकची घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2023 09:23 AM2023-02-01T09:23:03+5:302023-02-01T09:23:25+5:30

बोरगाव मंजू पोलिस ठाण्याच्या हद्दीत  राष्ट्रीय महामार्गावर बोरगाव मंजू नजीक एका ४५ वर्षिय पादचारी इसमा अज्ञात वाहनाच्या धडकेत जागेवरच ठार

Pedestrian killed in collision with unknown vehicle incident near Borgaon Manju | अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचारी ठार, बोरगाव मंजू नजीकची घटना

अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचारी ठार, बोरगाव मंजू नजीकची घटना

Next

बोरगाव मंजू

बोरगाव मंजू पोलिस ठाण्याच्या हद्दीत  राष्ट्रीय महामार्गावर बोरगाव मंजू नजीक एका ४५ वर्षिय पादचारी इसमा अज्ञात वाहनाच्या धडकेत जागेवरच ठार झाल्याची घटना १ फेब्रुवारी बुधवारी सकाळी  घडली, विजय गवळी असे मृतकाचे नाव आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बोरगाव मंजू रामजी नगर येथील विजय नगण्णा गवळी वय ४५ हे सकाळी सोनाळा मार्ग महामार्गावर पायी पादचारी जात असताना अज्ञात वाहनाच्या धडकेत जागेवरच ठार झाले, दरम्यान घटनेची माहिती मिळताच ठाणेदार पुरुषोत्तम ठाकरे, हेडकॉन्स्टेबल संतोष निबेंकर, सतिष सपकाळ, तुषार मोरे आदींनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा व मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अकोला येथील शासकीय रुग्णालयात दाखल केला, दरम्यान अपघातानंतर पसार झालेल्या अज्ञात वाहनाचा पोलिस शोध घेत आहेत,

Web Title: Pedestrian killed in collision with unknown vehicle incident near Borgaon Manju

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात