अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचारी ठार, बोरगाव मंजू नजीकची घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2023 09:23 IST2023-02-01T09:23:03+5:302023-02-01T09:23:25+5:30
बोरगाव मंजू पोलिस ठाण्याच्या हद्दीत राष्ट्रीय महामार्गावर बोरगाव मंजू नजीक एका ४५ वर्षिय पादचारी इसमा अज्ञात वाहनाच्या धडकेत जागेवरच ठार

अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचारी ठार, बोरगाव मंजू नजीकची घटना
बोरगाव मंजू
बोरगाव मंजू पोलिस ठाण्याच्या हद्दीत राष्ट्रीय महामार्गावर बोरगाव मंजू नजीक एका ४५ वर्षिय पादचारी इसमा अज्ञात वाहनाच्या धडकेत जागेवरच ठार झाल्याची घटना १ फेब्रुवारी बुधवारी सकाळी घडली, विजय गवळी असे मृतकाचे नाव आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बोरगाव मंजू रामजी नगर येथील विजय नगण्णा गवळी वय ४५ हे सकाळी सोनाळा मार्ग महामार्गावर पायी पादचारी जात असताना अज्ञात वाहनाच्या धडकेत जागेवरच ठार झाले, दरम्यान घटनेची माहिती मिळताच ठाणेदार पुरुषोत्तम ठाकरे, हेडकॉन्स्टेबल संतोष निबेंकर, सतिष सपकाळ, तुषार मोरे आदींनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा व मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अकोला येथील शासकीय रुग्णालयात दाखल केला, दरम्यान अपघातानंतर पसार झालेल्या अज्ञात वाहनाचा पोलिस शोध घेत आहेत,