शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

व्याज भरा, नाहीतर नवीन कर्ज नाही; शेतकरी पुन्हा संकटात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2020 06:50 IST

राज्यभरातील जिल्हा बँकांची भूमिका

- स. सो. खंडाळकर औरंगाबाद : उद्धव ठाकरे सरकारने सत्तेवर येताच शेतकऱ्यांसाठी महात्मा जोतिबा फुले कर्जमाफी योजना जाहीर केली. या योजनेची अंमलबजावणी सुरू असतानाच कोरोना महामारीचे संकट आले. आधीच हे गंभीर संकट असताना औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसह राज्यभरातील जिल्हा बँकांनी व्याज भरल्याशिवाय शेतकऱ्यांना नवीन कर्ज द्यायचे नाही, अशी भूमिका घेतल्याने शेतकºयांवर दुहेरी संकट कोसळले आहे.राज्य सरकारकडून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची रक्कम उशिरा मिळाली. त्या रकमेच्या व्याजासाठी शेतकºयांची अडवणूक होत आहे.शासनाचे अवर सचिव व सहनिबंधक रमेश शिंगटे यांच्या २२ मेच्या पत्रानुसार खरीप हंगाम २०२० साठी शेतकºयांना नवीन पीककर्ज द्यावे असे म्हटले आहे. व्याज आम्ही भरू, अशी शासनाची भूमिका आहे. व्याज वसुली शेतकºयांकडून करू नये, असे पत्र सहकार आयुक्तांनी बँकांना दिले आहे. जिल्हा उपनिबंधकांनीसुद्धा शेतकºयांकडून व्याज वसुली न करण्याबाबत बँकेला पत्रे पाठविलेली आहेत. औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील व कार्यकारी संचालक शिंदे यांनी सांगितले की, व्याज आकारणीबद्दल आम्हाला सरकारकडून स्पष्ट सूचना नाहीत.पाच महिने रक्कम उशिरा वर्ग३० मे २०२० पर्यंत कर्जमाफीचा लाभ शेतकºयांना झाला. कोरोनामुळे ही रक्कम बँकेच्या खात्यात वर्ग करण्यास पाच महिने उशीर झाला. त्यामुळे जिल्हा बँका व इतर बँकांनी या सहा महिन्यांचे व्याज शेतकºयांकडूनच वसूल करायला सुरुवात केली. व्याज दिल्याशिवाय जिल्हा बँकांच काय इतर विविध कार्यकारी सोसायट्यांकडूनही नवीन कर्ज दिले जात नाही, अशी तक्रार वाढलेली आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी