शहरं
Join us  
Trending Stories
1
अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक 
2
राज्यासमोर मोठं संकट! जगभरात थैमान घालणाऱ्या आजाराचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ
3
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्रित लढणार!
4
६००० रुपयांचा बोनस आणि...; एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी तिप्पट गोड!
5
Video: आधी कानाखाली मारल्या, नंतर धरली मान; मॅच सुरू असतानाच स्टेडियमध्ये 'बाई, काय हा प्रकार'
6
ठाणे-वसईकरांचे हाल! घोडबंदर मार्गावर चार-चार तास वाहतूक कोंडी
7
पाकिस्तानात शरणार्थी, मशिदीतून शिक्षणाची सुरुवात; तालिबानी परराष्ट्रमंत्री मुत्ताकी किती शिक्षित आहेत? जाणून घ्या...
8
ईतवारी एक्सप्रेसमध्ये सापडले सोन्याचे घबाड, एकाला अटक; साडेतीन कोटींचे सोने जप्त!
9
उल्हासनगर भाजपाकडून पाणी टंचाई विरोधात मोर्चा; योगेश म्हात्रे यांच्याकडून आत्महत्येचा प्रश्न 
10
"शेतकरी पॅकेज, कर्जमाफी, लाडकी बहीण या मुद्द्यांवर  महायुती सरकारकडून जनतेची फसवणूक’’, रमेश चेन्नीथला यांचा आरोप
11
"डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळावा म्हणून आम्ही..."; इस्रायलचे PM बेंजामिन नेतन्याहूंनी मानले ट्रम्प यांचे आभार
12
तेज प्रताप यादव यांनी २१ जागांवर उमेदवार उभे केले; स्वतः या जागेवरून निवडणूक लढवणार
13
अरे देवा हे काय, विद्यार्थ्यांच्या बॅगमध्येच कोयते-चॉपर! नाशिकमधील भाईगिरीचे 'फॅड' शाळेपर्यंत
14
मुंबईत ठाकरे बंधूंसोबत लढायचं की स्वतंत्रपणे? काँग्रेसच्या नेत्यांनी हायकमांडकडे केली अशी मागणी
15
सात दिवस उलटूनही IPS पूरन कुमार यांच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम नाही; पत्नीने केली मोठी मागणी...
16
‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ योजना बंद झाल्याची चर्चा? शालेय शिक्षण विभागाने दिली अशी माहिती
17
कुलदीप यादवच्या डोक्यावर 'नंबर १'चा ताज; जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या गोलंदाजांना टाकले मागे!
18
पल्सर की युनिकॉर्न? 'या' २ दमदार बाईक्समध्ये कोण आहे वरचढ? जाणून घ्या किंमत, मायलेज आणि फीचर्स!
19
'बॅड्स ऑफ बॉलिवूड'च्या यशानंतर लक्ष्यला लागली मोठी लॉटरी, धर्मा प्रॉडक्शनचा चौथा सिनेमा केला साइन
20
Nashik Crime: 'कोणी लागत नाही नादी', पोलिसांना आव्हान माजी नगरसेवक पवन पवारविरोधात गुन्हा

'पवार साहेबां' च्या मनातला 'मुख्यमंत्री' बहुदा ठरलाय की काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2019 17:52 IST

शरद पवार यांच्या मनाचा अंदाज बांधणे तसे सहजासहजी कुणालाही शक्य होत नाही...

शरद पवार यांच्या मनाचा अंदाज बांधणे तसे सहजासहजी कुणालाही शक्य होत नाही. त्यांच्या प्रत्येक कृती, वक्तव्यात कायमच सस्पेन्स आणि काढू तितके अर्थ दडलेले असतात. गेल्या काही दिवसांतील घडामोडी पाहता महाराष्ट्राच्या राजकारणाचे पूर्णपणे केंद्रबिंदू ठरलेल्या साहेबांनी ' किंगमेकर'  म्हणूनही स्वतःचा तितकाच दबदबा निर्माण केला आहे. पण काल मुंबईत त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची गोळाबेरीज केली तरी शंभरी पार होत नाही. नाहीतर आम्ही देखील सरकार स्थापन केले असते, असे वक्तव्य केले. जनतेने आम्हाला सक्षम विरोधीपक्षाची भूमिका पार पडण्याची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे सत्ता स्थापन करण्यात आम्हाला कोणताही रस नाही. तसेच जनतेने महायुतीला सरकार स्थापनेचा कौल आहे.

पवार साहेबांच्या या वक्तव्याने राजकीय पटलावरील अनेकांच्या सत्तेच्या गोळा बेरजेला मुरड घातली हे वेगळे सांगायला नको..  आणि तिथेच साहेबांच्या मनातला मुख्यमंत्री कोण याचा अंदाज बांधणे काही प्रमाणात का होईना शक्य झाले. पुन्हा एकदा '' देवेंद्र फडणवीस'' यांनीच मुख्यमंत्री पदाची जबाबदारी सांभाळावी असे तर त्यांच्या मनात नसेल ना..        २०१४ साली झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीनंतरही शिवसेनेची भूमिका आजच्यापेक्षा फार काही वेगळी नव्हती. पण त्यावेळी साहेबांनी भाजपाला बाहेरून पाठिंबा जाहीर करत शिवसेनेच्या नाराजी नाट्यातील हवाच काढून टाकली. त्यानंतर डोळे पुसून रडत कढत सेनेला भाजपासोबत अख्खा पाच वर्ष संसार थाटावा लागला होता. तसेच जे काही पदरात पडले ते गोडं मानून घ्यावे लागले होते. पण ही धुसफूस अगदी २०१९ साली पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या उंबरठ्यावर देखील कायम होती.
त्यानंतर अमित शहांनी मुख्यमंत्र्यांना सोबत घेऊन थेट मातोश्री गाठत उद्धव ठाकरें यांच्याशी बंद दरवाजाआड जी काही चर्चा केली तिथून मग पुन्हा एकदा काही झालंच नव्हतं या आविर्भावात तुझ्या गळा माझ्या गळा गुंफू मोत्यांच्या माळा म्हणत महायुतीचं बिगुल वाजवलं गेलं. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ही युती कायम राहिली. विधानसभा निवडणुकीच्या वेळी भाजपने स्वतः १५० जागा लढवत सेनेला १२४ जागा दिल्या. पुणे शहरात तर एकही जागा दिली नाही.त्यामुळे आधी पाच वर्षात झालेल्या आणि विधानसभेच्या पार्श्वभूमीवर झालेल्या मानहानीकारक अपमानांची आग शिवसेनेच्या गोटात चांगलीच धगधगत होती. मात्र, नियतीने निवडणुक निकालानंतर शिवसेनेला चुन चुनके बदला घेण्याची नामी संधी मिळवून देत सत्ता स्थापनेत भाजपवर गुरगुरण्याची, रडकुंडीला आणण्याची चांगली संधी दिली. 

त्यात या महाभारतात सेनेने सत्ता स्थापनेची सूत्रे दिली ती संजय राऊत नावाच्या धुरंधराकडे.. त्यांनी मग आपले सगळे डावपेच संपादकीय कौशल्य पणाला लावत कधी राष्ट्रवादी तर कधी काँग्रेस नेत्यांच्या भेटीगाठी घेत भाजपावर एकापेक्षा एक तीक्ष्ण वाक्यांचे शरसंधान करत घायाळ केले आहे.

एकीकडे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच असेल अशी ठाम भूमिका घेत त्यांनी भाजपाला जेरीस आणले आहे असताना पवार साहेबांनी काल शिवसेनेची कोंडी करणारी ' गुगली' टाकली. विधानसभा निवडणुकीच्या निकालापासून त्यांनी अगदी कालपर्यंत घेतलेली भूमिका ही शिवसेनेला गोंजारणारी किंवा दिलासादायक होती असेच प्रथमदर्शनी सर्वाना वाटत होते. त्याच अनुषंगाने संजय राऊत यांनी देखील पवारांच्या प्रत्येक भेटीचा इव्हेंट आणि शिवसेनेच्या मार्केटिंगसाठी जास्तीत जास्त कसे होईल याचीच काळजी घेत होते.  मात्र, पवार यांनी बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी पक्ष सत्ता स्थापन करणार नसून विरोधीपक्षात बसणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले. 

पवार साहेबांच्या मनात सध्या तरी शिवसेनेचा मुख्यमंत्री नको अशीच भूमिका असा अंदाज वाटतो. कारण भाजपाकडे असणाऱ्या सर्वाधिक जागा आणि राज्यातील यापुढील काळातील गंभीर परिस्थिती पाहता इथे सक्षम निर्णय घेणारा आणि निदान काही वर्षांचा अनुभवी मुख्यमंत्री असावा अशी त्यांच्या मनाची धारणा कदाचित असू शकते. पवार साहेब हे पक्के राजकारणी जरी असले तरी ते एक परिपक्व नेते आहे. ते राजकारणा बरोबरच सामाजिक भानही वेळोवेळी दाखवले आहे. किंबहुना कालही त्यांनी अयोध्या निकालानंतर शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. पण त्यांनी भाजप आणि शिवसेनेला लवकरात लवकर सत्ता स्थापन करण्याचा दिलेला सल्ला माध्यमे आणि भाजपा- शिवसेनेला सत्ता स्थापनेचा संघर्ष टाळत सरकार स्थापन करण्याचा सल्ला दिला आहे.

सध्याच्या परिस्थितीला तरी फडणवीस यांच्याखेरीज दुसरा सक्षम पर्याय महायुतीत अस्तित्वात नाहीत. तसेच केंद्रातील नरेंद्र मोदींशी असलेली त्यांची जवळीक पाहता शरद पवार साहेबांच्या मनातला मुख्यमंत्री कदाचित देवेंद्र फडणवीस असावेत.? 

टॅग्स :PuneपुणेSharad Pawarशरद पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसShiv SenaशिवसेनाBJPभाजपाGovernmentसरकारSanjay Rautसंजय राऊत