शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

..पवार तरी लढलेत का पाच जिल्ह्यातून : चंद्रकांत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2019 10:54 IST

‘‘राजकारणात महत्वाकांक्षा ठेवावीच लागते. ती नसेल तर माणूस एकतर सामाजिक कार्य करतो किंवा मग एखाद्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा अध्यक्ष होण्यावरच समाधान मानतो.

ठळक मुद्दे मी पाच जिल्ह्यातून लढतो हेगडेवार, सावरकर, फुले, आंबेडकर यांना सर्वसामान्यांविषयी कणव होती, हाच भाजपाचाही विचार

 पुणे: ‘मी कधी लोकांमधून निवडून आलेलो नाही असा आक्षेप घेणाऱ्या पवारांना माहिती नसेल, पण मी पाच जिल्ह्यांमधून निवडून येतो. त्यांनी तरी कधी पाच जिल्ह्यांमधून निवडणूक लढवली आहे का?’ असा सवाल भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष, पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज केला. पदवीधर मतदारसंघातील मतदार उलट जास्त विचारी व हुशार असतात असे ते म्हणाले.पक्षाच्या शहर शाखेच्या वतीने प्रभाग क्रमांक २८ मध्ये पाटील यांच्या स्वागताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर पत्रकारांबरोबर बोलताना पाटील यांनी अनेक प्रश्नांना उत्तरे दिली. शिवसेनेचे आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री म्हणून प्रदर्शित केले जात आहे यावर ते म्हणाले, ‘‘राजकारणात महत्वाकांक्षा ठेवावीच लागते. ती नसेल तर माणूस एकतर सामाजिक कार्य करतो किंवा मग एखाद्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा अध्यक्ष होण्यावरच समाधान मानतो. त्यामुळे ते तसे प्रदर्शित करत असतील तर त्यात काही गैर नाही.’’भाजपाचे सगळे काही स्वबळावर असल्यासारखे सारखे चालले आहे याकडे लक्ष वेधले असता पाटील म्हणाले, ‘‘तसे काहीच नाही. आम्ही युतीचे म्हणूनच सगळे बोलत असतो. जागा वाटपाचा मुद्दा असेल तर ज्यांच्याकडे ज्या जागा आहेत त्या तशाच ठेवणे हे कोणत्याही युतीमधील सर्वसाधारण तत्व असते. तसेच ते आहे. एखाद्या जागेबद्दल देवाणघेवाण होऊ शकतो, मात्र तो विषय वरिष्ठ स्तरावर होतो, स्थानिक स्तरावर नाही. त्यासाठी राजकीय स्थिती लक्षात घेतली जाते. पुण्यातील विधानसभेच्या सर्व जागा भाजपाकडे आहे, मात्र त्यात काय होईल ते आत्ताच सांगता येणार नाही. आम्ही काही देणार असून तर त्यांनाही काहीतरी द्यावे लागेल. त्याचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील.’’काँग्रेसमुक्त राज्य करायचे असे म्हणतो त्यावेळी काँग्रेसच्या घराणेशाही, भ्रष्ट कारभार, बेशिस्त या संस्कृतीपासून राज्याला मुक्त करायचे असा त्याचा अर्थ असतो असे पाटील यांनी सांगितले. काँग्रेसमधील नेत्यांना भाजपात घेऊन का असे विचारले असता पाटील म्हणाले, ‘‘भाजपात घेताना तावूनसुलाखून घेतले जाते. आम्ही विखे यांना पक्षात घेतले, भूजबळांना घेतलेले नाही. विखे यांच्यावर कसलेही आरोप नाहीत. एकूण आमदार किंवा मंत्री यामध्ये भाजपाचे प्रमाणच जास्त आहे. गेल्या ५ वर्षात बाहेरून घेतलेल्या फक्त विखे यांना मंत्री केले आहे. भाजपाचा मुळ विचार राष्ट्रीय विचार आहे. हेगडेवार, सावरकर, फुले, आंबेडकर यांना सर्वसामान्यांविषयी कणव होती, हाच भाजपाचाही विचार आहे.’’

टॅग्स :Puneपुणेchandrakant patilचंद्रकांत पाटीलBJPभाजपाShiv SenaशिवसेनाElectionनिवडणूक