शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

सिग्नल बिघडल्यामुळे प्रवाशांचे हाल

By admin | Updated: April 11, 2015 05:45 IST

उपनगरीय रेल्वेमार्गावर बिघाडाची परंपरा सुरूच असून, यामुळे प्रवाशांना मोठा फटका बसत आहे. शुक्रवारी सकाळी पश्चिम रेल्वेमार्गावर आणि दुपारी मध्य रेल्वे

मुंबई : उपनगरीय रेल्वेमार्गावर बिघाडाची परंपरा सुरूच असून, यामुळे प्रवाशांना मोठा फटका बसत आहे. शुक्रवारी सकाळी पश्चिम रेल्वेमार्गावर आणि दुपारी मध्य रेल्वेमार्गावर सिग्नलमध्ये बिघाड झाला; आणि या बिघाडांनी प्रवाशांचे चांगलेच हाल झाले. या दोन्ही मार्गांवरील लोकल २० मिनिटे उशिराने धावत होत्या. सकाळी सव्वा नऊच्या सुमारास अंधेरी ते जोगेश्वरीदरम्यान अप धीम्या मार्गावर सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला त्यामुळे कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांचे चांगलेच हाल केले. बिघाडाची माहिती मिळताच पश्चिम रेल्वेच्या तांत्रिक कर्मचाऱ्यांनी सिग्नल यंत्रणा दुरुस्तीचे काम हाती घेतले. तोपर्यंत अप धीम्या मार्गावरील लोकल अप जलद मार्गावर वळविण्यात आल्या. मात्र त्याचा फटका अधिकच बसत गेल्याने लोकल २० मिनिटे उशिराने धावू लागल्या. त्यामुळे चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या सर्वच स्थानकांवर प्रवाशांची तुडुंब गर्दी झाली. अनेक प्रवासी लोकलची प्रतीक्षा करताना दिसत होते. सिग्नल यंत्रणेतील बिघाड अर्धा तासात दुरुस्त करण्यात आल्यानंतर अप धीमा मार्ग पूर्ववत करण्यात आला. मात्र या बिघाडामुळे दुपारपर्यंत पश्चिम रेल्वेचे वेळापत्रक विस्कळीतच राहिले. (प्रतिनिधी)