कासारवाडीजवळ रेल्वेतून पडून प्रवाशाचा मृत्यू
By Admin | Updated: June 10, 2016 01:49 IST2016-06-10T01:49:36+5:302016-06-10T01:49:36+5:30
लोणावळ्याहून पुण्याकडे जाणाऱ्या लोकलमधून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाचा रेल्वेतून पडून मृत्यू झाला

कासारवाडीजवळ रेल्वेतून पडून प्रवाशाचा मृत्यू
पिंपरी : लोणावळ्याहून पुण्याकडे जाणाऱ्या लोकलमधून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाचा रेल्वेतून पडून मृत्यू झाला. ही घटना कासारवाडी ते दापोडी रेल्वेस्थानकाच्या दरम्यान घडली. रेल्वेखाली सापडून अपघातात मृत्यू होण्याची दोन दिवसातील ही तिसरी घटना आहे.
गुरुवारी दुपारी ३च्या सुमारास कासारवाडी रेल्वेस्थानकाजवळ रेल्वे पोलिसांना अंदाजे ४० वर्षे वयाच्या व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. मृत्यू झालेल्या प्रवाशाची ओळख पटलेली नाही. दोन दिवसांपूर्वी कासारवाडी आणि पिंपरी रेल्वेस्थानकाजवळ रेल्वे रूळ ओलांडत असताना, झालेल्या अपघातात दोन जण ठार झाले. संजय दिगंबर राठोड (वय २५, रा. डुडुळगाव) असे एकाचे नाव आहे, तर
दुसऱ्याची ओळख पटलेली नव्हती. दोन दिवसांत घडलेल्या रेल्वे अपघाताच्या घटनेत गुरुवारी तिसरा बळी गेला आहे. (प्रतिनिधी)