शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

पडसलगीकरांनी स्वीकारली मुंबईची धुरा

By admin | Updated: February 1, 2016 03:06 IST

: दहशतवाद, संघटित गुन्हेगारी, सायबर, आर्थिक गुन्हे आणि महिला व ज्येष्ठ नागरिकांबाबत घडणारे गुन्हे रोखणे याला माझे सर्वोच्च प्राधान्य असेल,

मुंबई : दहशतवाद, संघटित गुन्हेगारी, सायबर, आर्थिक गुन्हे आणि महिला व ज्येष्ठ नागरिकांबाबत घडणारे गुन्हे रोखणे याला माझे सर्वोच्च प्राधान्य असेल, असे मुंबईचे नूतन पोलीस आयुक्त दत्तात्रय पडसलगीकर यांनी म्हटले. रविवारी त्यांनी मावळते आयुक्त अहमद जावेद यांच्याकडून पदाची सूत्रे स्वीकारली. पडसलगीकर म्हणाले, की नागरिकांशी संपर्क साधण्यासाठी अहमद जावेद यांनी सोशल मीडियाचा वापर सुरू केला होता; मीदेखील तो कायम ठेवणार आहे. मुंबई शहर हे गतिशील असल्यामुळे पोलिसांना नेहमीच सावध राहावे लागते. प्रत्यक्षात बंदोबस्तावर असलेले पोलीस कर्मचारी हे त्यांच्यावर देखरेख करणाऱ्या वरिष्ठांपेक्षा जास्त महत्त्वाचे आहेत, असे त्यांनी सांगितले.मुंबई शहराला असलेल्या इसिस कारवायांच्या धोक्याबद्दल विचारले असता पडसलगीकर म्हणाले, की इसिसमध्ये जाण्यापासून काही जणांना रोखण्याचे काम पोलिसांनी केले आहे़ तर काही जण त्या दहशतवादी संघटनेत दाखल झाले व काहींना अटक करण्यात आली. युवकांना त्यांनी कधीही कल्पना केली नसतील अशी आमिषे दाखविण्यात आली. अशा युवकांना त्यापासून रोखून माघारी आणण्यासाठी कुटुंबातून, शिक्षकांकडून दबाब असला पाहिजे. पडसलगीकर म्हणाले की, दहशतवादी प्रकरणांची हाताळणी महाराष्ट्र एटीएस (दहशतवादविरोधी पथक) करीत असून मुंबई पोलीस एटीएस आणि संबंधित इतर केंद्रीय यंत्रणांनाही पूर्ण सहकार्य करतील. छोटा राजनचे प्रत्यार्पण, शीना बोरा हत्याकांड अशी अत्यंत महत्वाची प्रकरणे केंद्रीय गुप्तचर खात्याकडे सोपविण्यात आल्यामुळे मुंबई पोलिसांच्या क्षमतेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे का, असे विचारता ते म्हणाले की, सीबीआय तपास करणारी विशेष अशी यंत्रणा असून अनेक राज्यांतील प्रकरणांचा तपास ती करू शकते. प्रत्येक प्रकरण हे दुसऱ्या प्रकरणापासून वेगळे असते.अहमद जावेद यांनी मुंबई पोलिसांना दोन टिष्ट्वटरवर सक्रिय केले होते. तोच पुढाकार तुम्ही कायम राखणार का, असे विचारता ते म्हणाले की सोशल मीडिया हे नागरिकांच्या संपर्कात राहण्यासाठी चांगले माध्यम आहे व जावेद यांनी सुरू केलेल्या चांगल्या गोष्टी मी सुरू ठेवीन.इसिसमध्ये जाण्यापासून काही जणांना रोखण्याचे काम पोलिसांनी केले आहे; काहींना अटक करण्यात आली आहे. दहशतवादी प्रकरणांची हाताळणी महाराष्ट्र एटीएस (दहशतवादविरोधी पथक) करीत असून, मुंबई पोलीस एटीएस आणि संबंधित इतर केंद्रीय यंत्रणांनाही पूर्ण सहकार्य करतील. - दत्तात्रय पडसलगीकर, पोलीस आयुक्त, मुंबई