आयारामांसाठी सेना-भाजपमध्ये रस्सीखेच
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2019 16:52 IST2019-07-31T16:43:50+5:302019-07-31T16:52:47+5:30
गेल्या काही दिवसांपासून भाजप-शिवसेनेत इतर पक्षाच्या नेत्यांची इनकमिंग सुरु आहे. त्यातच आता थेट विद्यामान आमदारांच्या पक्षप्रवेशाचा दोन्ही पक्षांनी धडाका लावला आहे.

आयारामांसाठी सेना-भाजपमध्ये रस्सीखेच
मुंबई - विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप-शिवसेनेने फोडाफोडीचे राजकरण करत, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक विद्यामान आमदार आणि नेत्यांचे पक्षप्रवेश करून घेतले आहे. मात्र पक्षप्रवेश करणाऱ्या आमदार आणि नेत्यांना आपल्याच पक्षात घेण्यात यावे यासाठी भाजप-सेनेत रस्सीखेच सुरु असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे याबाबतीत खुद्द भाजपचे नेते आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवर यांनी खुलासा केला आहे. मुंबईतल्या गरवारे क्लब येथे झालेल्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
गेल्या काही दिवसांपासून भाजप-शिवसेनेत इतर पक्षाच्या नेत्यांची इनकमिंग सुरु आहे. त्यातच आता थेट विद्यामान आमदारांच्या पक्षप्रवेशाचा दोन्ही पक्षांनी धडाका लावला आहे. मात्र भाजप-सेनेत पक्षप्रवेशावरून रस्सीखेच सुरु असल्याचे समोर आले आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षात नाराज असलेल्या आमदारांना आपल्या पक्षात घेण्यासाठी ऑफर दिल्या जात आहे. विशेष म्हणजे याचा खुलासा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवर यांनीच केला आहे.
वडाळा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार कालिदास कोळंबकर हे मला नेहमी येऊन भेटायचे आणि पक्ष प्रवेशाचे काय झाले असे विचारायचे. त्याचे कारणही म्हणजे इतर पक्ष सुद्धा आग्रह करत होते. तुम्ही आमच्या पक्षात या हे बंधन बांधा ते बंधन बांधा अशा ऑफर त्यांना येत होत्या. म्हणून ते पक्षप्रवेशासाठी फार आग्रही होते. असा खुलासा मुनगंटीवर यांनी यावेळी केला. त्यामुळे विद्यामान आमदारांना आपल्या पक्षात घेण्यासाठी भाजप-सेनेत रस्सीखेच सुरु असल्याची चर्चा पहायला मिळत आहे.