शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

गुंतवणूकदारांसोबत सरकारची भूमिका भागीदाराची

By admin | Updated: December 2, 2014 04:29 IST

‘मेक इन महाराष्ट्र’चे ध्येय गाठण्याचा आमचा ठाम निर्धार असून, उद्योग, गुंतवणूक क्षेत्रातील सर्व परवानग्या फास्ट ट्रॅकवर आणण्यात येतील

मुंबई : ‘मेक इन महाराष्ट्र’चे ध्येय गाठण्याचा आमचा ठाम निर्धार असून, उद्योग, गुंतवणूक क्षेत्रातील सर्व परवानग्या फास्ट ट्रॅकवर आणण्यात येतील आणि गुंतवणूकदारांसोबत आम्ही भागीदाराची भूमिका पार पाडू, असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील करंजा येथील जागतिक दर्जाच्या बहुउद्देशीय पोर्ट टर्मिनल आणि लॉजिस्टिक इन्फ्रास्ट्रक्चर या प्रकल्पाचा औपचारिक प्रारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सह्याद्री अतिथीगृहात झाला, त्या वेळी ते बोलत होते. या वेळी परिवहन व बंदरे विभागाचे प्रधान सचिव एस.के. शर्मा, उद्योग विभागाचे प्रधान सचिव अपूर्व चंद्रा, महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग जैन, करंजा टर्मिनल आणि लॉजिस्टिक प्रा.लि.चे अध्यक्ष निखिल गांधी व आमदार प्रशांत ठाकूर उपस्थित होते.मुख्यमंत्री म्हणाले की, महाराष्ट्रातील उद्योगांच्या भरभराटीसाठी हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार आहे. यामुळे रोजगाराच्या प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत. महाराष्ट्राला ७२० कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. त्यामुळे राज्यातील उद्योगांच्या भरभराटीसाठी बंदरांच्या सुविधाही आवश्यक आहेत. जवळपास एक हजार कोटी रुपयांची गुंतवणूक असलेला व येत्या दोन वर्षांत पूर्ण होणारा हा प्रकल्प करंजा परिसराचा कायापालट करणार आहे. शासनाने उद्योगांसाठी लागणाऱ्या परवानग्यांची संख्या कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी एक ई-प्लॅटफॉर्म तयार करण्यात येत आहे. जलद परवानग्यांसाठी सचिवस्तरीय समिती स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शासनाने घेतला आहे. ‘मेक इन महाराष्ट्र’चे ध्येय गाठण्यासाठी बंदरे, रेल्वे, रस्ते आदी सर्व क्षेत्रांत गुंतवणुकीची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात गुंतवणुकीसाठी पोषक वातावरण आहे. गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या उद्योजकांनी महाराष्ट्राला प्राधान्य द्यावे. निखिल गांधी यांनी शासनाच्या सहकार्याबद्दल आभार मानले. ते म्हणाले की, ‘मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते औपचारिक प्रारंभ झालेल्या या प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम आजच सुरू होत आहे. या प्रकल्पासाठी राज्य सरकारच्या विविध विभागांकडून मिळालेले त्वरित सहकार्य आणि प्रतिसाद हा आमच्यासाठी सुखद धक्का होता. हा प्रकल्प होत असलेल्या करंजा परिसराच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध राहू. दोन वर्षांत हा प्रकल्प कार्यान्वित करण्याचा आमचा निर्धार शासनाच्या विधायक प्रतिसादामुळे दुणावला आहे.’ कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक पवन बक्षी यांनी आभार मानले. (विशेष प्रतिनिधी)