शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
5
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
6
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
7
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
8
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
9
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
10
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
11
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
12
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
13
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
14
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
15
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
16
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
17
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
18
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
19
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
20
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश

अजित पवार धर्मसंकटात? राज्यसभेसाठी उमेदवार ठरेना; दिल्लीचं तिकीट मुलाला, पत्नीला, की...?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2024 13:11 IST

उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे दोन दिवस बाकी असतानाही अद्याप अजित पवार यांच्याकडून उमेदवाराची घोषणा करण्यात आलेली नाही.

Rajya Sabha Election ( Marathi News ) : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचे नेते आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी २५ जून रोजी पोटनिवडणूक होणार आहे. या जागेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे दोन दिवस बाकी असतानाही अद्याप अजित पवार यांच्याकडून उमेदवाराची घोषणा करण्यात आलेली नाही. या जागेसाठी अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि मुलगा पार्थ पवार या दोघांच्या नावाची चर्चा सुरू आहे. तसंच पक्षातील इतरही काही नेते इच्छुक असल्याने नक्की कोणाला उमेदवारी द्यायची, याबाबत राष्ट्रवादीत संभ्रम असल्याचं दिसत आहे. 

पार्थ पवार यांचा २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मावळ मतदारसंघातून पराभव झाला होता. तर यंदाच्या लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवार यांना बारामतीतून पराभवाचा धक्का सहन करावा लागला. या पार्श्वभूमीवर आपल्या कुटुंबातील एका सदस्याचं राज्यसभेच्या माध्यमातून राजकीय पुनर्वसन करण्याचा प्रयत्न अजित पवार यांच्याकडून केला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे ते नक्की पार्थ पवार यांना संधी देतात की सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सुनेत्रा पवार यांच्यासाठी ठराव

पुण्यातील नारायण पेठ येथील राष्ट्रवादीच्या कार्यालयात नुकताच पक्षाचा एक कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला शहराध्यक्ष दीपक मानकर यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर शहराध्यक्ष दीपक मानकर आणि कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि सर्वानुमते एक ठराव मांडण्यात आला. या ठरावाद्वारे सुनेत्रा पवार यांची राज्यसभेवर नियुक्ती करून त्यांना केंद्रीय राज्यमंत्री पद देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली. सुनेत्रा पवार राज्यसभेवर गेल्या तर बारामती लोकसभा मतदारसंघ आणि पुणे जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना बळ मिळू शकेल, अशी भूमिका मांडण्यात आली आहे.

कोणत्या जागांसाठी होणार निवडणूक?

केरळ आणि महाराष्ट्रातील मिळून चार जागांसाठी २५ जून रोजी राज्यसभेच्या निवडणुका होणार असल्याची घोषणा निवडणूक आयोगाने केली. एका निवेदनात, निवडणूक पॅनेलने म्हटले की केरळमधील तीन राज्यसभेच्या जागांसाठी निवडणुका होणार आहेत. तेथील विद्यमान खासदार एलराम करीम, बिनॉय विस्वम आणि जोस के मणी हे तिघेही १ जुलै रोजी निवृत्त होणार आहेत. याशिवाय, वरिष्ठ सभागृहात पुन्हा निवडून आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी राजीनामा दिल्यामुळे त्यांच्या रिक्त जागेसाठीही २५ जून रोजी पोटनिवडणूक होणार आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने दाखल केलेल्या अपात्रतेच्या याचिकेचा सामना करत असताना पटेल यांना राज्यसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार म्हणून उभे केले होते. त्यात ते जिंकले आणि त्यांना राज्यसभेची जागा मिळाली. त्यामुळे आता त्यांच्या जागी रिक्त पदावर कोणाला संधी मिळणार, याकडे साऱ्यांचेच लक्ष आहे.  

 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसRajya Sabhaराज्यसभाSunetra Pawarसुनेत्रा पवारparth pawarपार्थ पवार