मुंबई : राज्यसभा निवडणुकीसाठी राज्यातील सात उमेदवारांनी अर्जाबरोबर दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातून त्यांच्या संपत्तीची माहितीही समोर आली असून या सात उमेदवारांपैकी राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) उमेदवार पार्थ पवार हे सर्वात श्रीमंत उमेदवार आहेत. उमेदवारी अर्जाबरोबर दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्या नावावर ८८.३३ कोटी रुपयांची मालमत्ता आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर ज्येष्ठ नेते शरद पवार यांची ६०.७१ कोटी रुपयांची मालमत्ता आहे. शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारे यांच्या नावावर सर्वात कमी ३२ लाख रुपयांची मालमत्ता असल्याचे नमूद आहे.
अजित पवार यांचे पुत्र आणि शरद पवार यांचे नातू असलेल्या पार्थ पवार यांच्यावर कोणताही फौजदारी गुन्हा प्रलंबित नसल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पार्थ यांनी एकूण मालमत्ता १०.८ कोटी रुपये असल्याचे दर्शविले होते.
पार्थ यांच्या मालमत्तेमध्ये २ कोटी रुपयांचे दिलेले कर्ज, २.११ कोटी रुपयांची बँक ठेव, तसेच सुमारे २.५ कोटी रुपयांचे शेअर्स, बाँड्स आणि जमीनजुमल्याचा समावेश आहे.
वडकुते दुसऱ्या क्रमांकावर
भाजपचे ७२ वर्षीय रामराव वडकुते हे दुसऱ्या क्रमांकाचे ज्येष्ठ उमेदवार असून त्यांची एकूण मालमत्ता ५.६ कोटी रुपये आहे. भाजपच्या माया इवनाते यांनी ३.८ कोटी रुपयांची मालमत्ता जाहीर केली असून काही महिन्यांपूर्वी नागपूर महापालिका निवडणुकीत त्यांनी जवळपास इतकीच मालमत्ता दाखवली होती.
भाजप नेते विनोद तावडे यांनी ३१.८ कोटी रुपयांची मालमत्ता जाहीर केली आहे. २०१४ मध्ये बोरीवली विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवताना त्यांनी ६.८ कोटी रुपयांची मालमत्ता दाखवली होती.
रिपाई नेते आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी ८.९ कोटी रुपयांची मालमत्ता जाहीर केली आहे. २०२० मध्ये त्यांची मालमत्ता ६.४ कोटी रुपये होती, जी मागील सहा वर्षांत सुमारे ३८ टक्क्यांनी वाढली आहे.
Web Summary : Parth Pawar, NCP candidate, is the wealthiest Rajya Sabha nominee with ₹88.33 crore assets. Sharad Pawar follows with ₹60.71 crore. Jyoti Waghmare possesses the least, ₹32 lakh. Vinod Tawde's assets surged to ₹31.8 crore, while Ramdas Athawale's grew by 38% since 2020.
Web Summary : राकांपा उम्मीदवार पार्थ पवार ₹88.33 करोड़ की संपत्ति के साथ सबसे धनी राज्यसभा उम्मीदवार हैं। शरद पवार ₹60.71 करोड़ के साथ दूसरे स्थान पर हैं। ज्योति वाघमारे के पास सबसे कम, ₹32 लाख हैं। विनोद तावड़े की संपत्ति बढ़कर ₹31.8 करोड़ हो गई, जबकि रामदास अठावले की 2020 से 38% बढ़ी।